Vaibhav Mane
महाराष्ट्राचा प्रसिद्ध मराठी यूट्यूबर मूळचा कोणत्या जिल्हातील आहे माहित आहे का ?
Graduation पर्यंतचे शिक्षण हे गावाकडेच झालं, हालाकीच्या परिस्थितून त्याच्या आईवडिलांनी त्याला मुंबई सारख्या महागड्या शहरात उच्च शिक्षणासाठी पाठवले.
सांधण दरी येथील फोटो
आपल्या मातीतला माणूस आपले गड किल्ले जेव्हा मांडतो किंवा दाखवतो तेव्हा लोकांची अधिक पसंती वाढते.
आईने डोक्यावरून हात फिरवावा इतकी ओघवती भाषा,अस्सल मातीतली भाषा त्यामुळे जगभरातील मराठी दर्शकानी अक्षरशः डोक्यावर घेतले.
पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पण त्यांची आवड फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी.
ग्रामीण भाग आणि आर्थिक अडचणी यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण जिद्ध सोडेल तर मराठी माणूस कसला ?
नामंकित IT कंपनीतील नोकरी सांभाळून त्यांनी लोकांना गडकिल्ले दाखवले.
निळ्याशार पाण्यानी वेढलेल्या मालदीव मध्ये जीवन कदम.
अख्ख्या जगाला भुरळ पाडलेल्या मालदीव ला सुद्धा जीवन कदम यांनी नुकतीच भटकंती केली.
या प्रवासात आई वडिलांप्रमाणे त्यांच्या पत्नी प्रतिमा यांची साथ खूप मोलाची ठरली.
जीवन कदम यांनी आत्तापर्यंत १५० हुन अधिक गड किल्ले त्यांच्या चॅनेलवर दाखवले आहेत.
गडकिल्ल्यावरील अनेक थरार त्यांनी कॅमेरात कैद केले आहेत.
महाराष्ट्र तर तो नेहमी दाखवतोच, परंतु बाहेर राज्यातील व देशातील जग दुनियेची सुद्धा भटकंती तो आपल्या दर्शकांना घडवतो.
कर्नाटक मधील गांगावली नदीच्या पुलावरील एक सुंदर छायाचित्र.
तंगडतोड भटकंती सोबतच प्रवास वर्णन करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे असं तो म्हणतो.
बुलेट आणि व्लॉगर हे नातं कल्पनेच्या पलीकडचे असते.
आज त्याच्या सोबत नामांकित Brands काम करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात, त्याच कारण म्हणजे त्याचा सातत्यपूर्ण Quality व्हिडिओ बनविण्यावरील भर.
त्यांची पत्नी प्रतिमा व जीवन यांचा अंदमान मधील स्वराज बेटावरील एक सुंदर छायाचित्र.
त्यांचे व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक हे कधीही बोर न होण्याचं हे सुद्धा एक कारण असेल असं ते म्हणतात.
युट्यूब बद्दल जीवन कदम यांना पहिल्यांदा कधी माहिती मिळाली हे ऐकण्यासारखं आहे.
त्यांचा मित्र प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक म्हणजेच Prasika यांच्याकडून 2016 मध्ये त्याला युट्यूब संदर्भात माहिती मिळाली आणि त्याचा युट्यूब चा प्रवास सुरू झाला.
त्यांचा मुलगा तन्वीष आणि पत्नी प्रतिमा यांचा सुंदर फोटाे .
गाव खेड्यातून पुढे आलेला जीवन त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या आईवडीलांना व त्याच्या पत्नीला देतो.
OYO सारख्या कंपनी चा पहिला वहिला ट्रॅव्हल शो Touristic Affairs तोही मराठी मध्ये आपल्या मराठमोळ्या जीवन कदम सोबत केला आहे.
जगप्रसिध्द टोयोटा या कार कंपनी ने निवडलेले ते पहिले मराठी युटयूबर आहेत.
त्यांच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने त्यांना सन्मानित केले आहे.
Mamaearth नी निवडलेले ते पहिले मराठी Vlogger आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.