अभिनेता किरण माने यांनी पुन्हा एकदा ‘वारकरी संप्रदाया’चा उल्लेख करत एक पोस्ट लिहिली आहे
आता किरण मानेंची ती पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेते किरण माने यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिल आहे की, ‘जातपात, उच्चनीच सगळं पुसून माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे 'वारी'!
पुढे किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिल आहे की, आपल्या संतांनी भेदाभेद, वर्चस्ववादाविरोधात केलेला खतरनाक विद्रोह म्हणजे 'वारकरी संप्रदाय.' अशा विद्रोही संतांच्या मांदियाळीतला सुरूवातीच्या काळातला निडर हिरो होता - 'सेना न्हावी' !
संत नामदेवांनी हे अनमोल रत्न मध्यप्रदेशातल्या बांधवगड संस्थानातनं शोधून काढलं. संत सेना यांनी आपल्या परखड, रोखठोक शब्दांनी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला मुळापास्नं हादरे दिले असं पुढे किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिल आहे
पुढे त्यांनी लिहिले की, ‘धर्माचे थोतांड मांडून स्वत:चे पोट भरणारी बांडगुळं त्यांना ट्रोल करू लागली. पण सेना महाराज मागं हटले नाहीत.
कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्या सेना महाराजांना त्रिवार वंदन’, असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली आहे.