नमिता धुरी
भाज्या कापणे हे वेळखाऊ काम असते. काही सोप्या पद्धती वापरल्यास हे काम कमी वेळात होऊ शकते.
मेथीची जुडी धरून तिची मुळे कापून टाका. यामुळे पाने काढणे सहज शक्य होईल.
चार-पाच लसणीच्या पाकळ्या एकत्र घेऊन त्याची टोके चाकूने कापा. यामुळे लसणीची साले काढणे सोपे होईल.
फ्लॉवर मधून कापून घ्या आणि मग त्याची फुले वेगवेगळी करा.
कांद्याची दोन्ही टोके कापून टाका. उरलेला कांदा मधून कापा आणि मग त्याचे छोटे-छोटे तुकडे करा.
एकावेळी अनेक फरसबी एकत्र घेऊन कापा.
फणस फोडताना हातांना तेल लावा. त्याचे छोटे तुकडे करून घ्या मगच गरे काढा.
कणग्या सोलताना त्या आधी पाण्यात उकळून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.