Turmeric Tea : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हळदीचा चहा; जाणून घ्या फायदे

सकाळ डिजिटल टीम

हळद हा एक मसाल्याचं पदार्थ.. परंतु, अनेक प्रकारे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर म्हणून ओळखला जातो.

हळदीमध्ये असलेले पोषक घटक हे माणसाच्या शरीराला खूपच उपयोगी आहेत म्हणूनच की काय आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं. आज आपण जाणून घेऊया हळदीच्या चहाचे गुणकारी फायदे

हळदीचा चहा कसा तयार कराल- सर्वप्रथम एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि दहा मिनिटे ते उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. हा चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

वजन कमी होते- हळदीचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. जर तुमच्या कंबरेभोवती खूप चरबी असेल तर दररोज हळदीचा चहा प्या. यामुळे वजन खूप लवकर कमी होईल.

हृदय निरोगी राहते- हळदीमध्ये खूप अधिक अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. म्हणून हळदीचा चहा प्यायल्याने हृदय निरोगी राहतं.

अंगदुःखी दूर करते- हळद ही वेदनाशामक आयुर्वेदिक औषधी मानली जाते. त्यामुळे जर तुम्हाला अंगदुखीचा त्रास असेल तर आपण नक्कीच हळदीचा चहा प्यावा. या चहाचे सेवन केल्यानंतर अंग दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

डोळ्यांसाठी उपयुक्त- हळदीचा चहा डोळ्यांसाठी खूपचं फायदेशीर मानला जातो. हळदीच्या चहामध्ये खूप अधिक जीवनसत्त्वे असल्यामुळे हा चहा पिल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

मधुमेहावर नियंत्रण मिळते- ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी अवश्य हळदीचा चहा प्यावा. हळदीच्या चहामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Turmeric Tea Health Benefits