रोहित कणसे
IPL 2023 चे फायनल गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपरकिग्ज यांच्यामध्ये आज खेळले जाणार आहेत ते अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये काय खास आहे? चला जाणून घेऊया
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या त्या गोष्टी खास बनवतात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये 63 एकर जागेवर पसरले आहे.
या स्टेडियमच्या उभारणीसाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तसेच सर्वात मोठे क्रीडा स्टेडियम देखील आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियम एका दिवसात दोन वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले शकते.
या स्टेडियमची 1.32 लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे, जी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमपेक्षा जास्त आहे. मेलबर्नमध्ये 90,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज 4 ड्रेसिंग रूम आहेत.
55 खोल्या असलेले क्लब हाऊस देखील आहे, ज्यात इनडोअर आणि आउटडोअर गेम्स तसेच रेस्टॉरंट आणि ऑलिम्पिक आकाराचे स्विमिंग पूल, जिम तसेच 3D प्रोजेक्टर थिएटर आहे.
हे देशातील पहिले स्टेडियम आहे जेथे मैदानात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. इतर कोणत्याही स्टेडियममध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.
स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन एंट्री पॉइंट करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.