Sudesh
Lenovo ने भारतामध्ये आपला Tab M9 हा टॅबलेट लाँच केला आहे. विशेष म्हणजे याची किंमत स्मार्टफोनपेक्षाही कमी आहे.
या टॅबलेटमध्ये अँड्रॉईड 12 ही ओएस देण्यात आली आहे. तसंच, याच्यासोबत तीन वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. सोबतच यात मीडियाटेक हीलिओ G80 हा प्रोसेसर दिला आहे.
यामध्ये 9 इंच HD LCD TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पीक ब्राईटनेस 400 निट्स आहे.
Lenovo Tab M9 या टॅबमध्ये 4GB LPDDR4X रॅम देण्यात आली आहे. तसंच, 64GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येतं.
यामध्ये मागच्या बाजूला 8 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढच्या बाजूला 2 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.
या टॅबमध्ये 5,100 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा टॅब 15W चार्जिंगला सपोर्ट करतो.
यामध्ये तुम्ही 4G LTE सिम वापरू शकता. तसंच यामध्ये ब्लूटूथ 5.1, वायफाय 802.11AC, हेडफोन पोर्ट आणि एक यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आलं आहे.
याच्या बेस व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये असणार आहे. ब्लू आणि ग्रे अशा दोन रंगांमध्ये हा टॅब उपलब्ध असेल.
तुम्हालाही हा स्वस्तात मस्त टॅब हवा असेल, तर 1 जूनपासून अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि लिनोव्होच्या वेबसाईटवरून तुम्ही हा टॅबलेट खरेदी करू शकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.