नारळाच्या दुधापासून तयार करा स्क्रब, माइश्चरायजर

नमिता धुरी

४ चमचे ओट्समध्ये १ चमचा मध घाला. हे मिश्रण एक किंवा अर्धा कप नारळाच्या दुधात २० मिनिटे भिजत ठेवा.

हे मिश्रण स्क्रबसारखे चेहऱ्यावर घासा. यामुळे मुरुमे येणार नाहीत आणि चेहऱ्याची चमक टिकून राहील.

अर्धा कप खोबरेल तेलात २ चमचे ग्लिसरिन आणि १ चमचा गुलाब पाणी मिसळा. हे मिश्रण काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

हे मॉइश्चरायजर लावल्याने त्वचेची सौम्यता आणि आर्द्रता टिकून राहाते.

अर्धा कप खोबरेल तेलात २ चमचे लिंबूचा रस, १ चमचा अॅलोवेरा जेल घाला. याचा उपयोग कंडिशनर म्हणून करता येईल.

नारळाच्या दुधामुळे केसांचा कोरडेपणा आणि दुतोंडी केसांपासून सुटका होते.

१ चमचा ऑलिव्ह तेलामध्ये १ चमचा नारळाचे दूध मिसळा. याचा वापर मेक-अप रिमूव्हर म्हणून करता येईल.

त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी नारळाचे दूध उपयुक्त ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.