Swapnil Kakad
भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित असलेली मारुती सुझुकी जिम्नी 5-डोर SUV मारुती सुझुकी इंडियाने लॉन्च केली असून एसयूव्हीची किंमत १२.७४ लाख एवढी आहे.
जिम्नी 5-डोअर झेटा आणि जिम्नी 5-डोर अल्फा या दोन प्रकारांमध्ये ती उपलब्ध असेल. आणि आतापर्यंत SUV ची ३०००० पेक्षा जास्त बुकिंग झाले आहे असा दावा कंपनीचा आहे.
डायमेन्शन्सच्या बाबतीत थारला 3-डोअर लेआउट आहे आणि जिम्नीला 5-डोअर लेआउट आहे. महिंद्रा थारची लांबी ३९८५ मिमी, रुंदी १८२० मिमी, उंची १८९६ मिमी आणि व्हीलबेस २४५० मिमी एवढा आहे.
थार च्या तुलनेत मारुती सुझुकी जिम्नीची लांबी ३९८५ मिमी, रुंदी १६४५ मिमी, उंची १७२० मिमी आणि व्हीलबेस २५९० मिमी एवढा आहे.
महिंद्रा थारला १८ इंची अलॉय व्हील असलेले 255/65-सेक्शनचे A/T टायर तर जिम्नी 5-डोअरला 15-इंच अलॉय व्हील असलेले 195/80 सेक्शनचे H/T टायर मिळतात.
महिंद्रा थारला तीन इंजिन पर्याय येतात - १५० bhp आणि ३०० NM सह २.०-लीटर टर्बो पेट्रोल, १३० bhp आणि ३०० NM सह २.२ लीटर टर्बो डिझेल आणि ११७ bhp आणि ३०० NM टॉर्कसह १.५-लीटर टर्बो डिझेल असे इंजिन चे प्रकार महिंद्रा थारला येतात.
त्याच्या मुकाबल्यात जिम्नीला सिंगल-इंजिन पर्याय मिळतो. १०३ bhp आणि १३४ NM टॉर्क सह १.५- लिटर NA पेट्रोल इंजिन.
महिंद्रा थारला LED DRLs सह हॅलोजन हेडलॅम्प, Apple CarPlay/Android Auto सोबत ७-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सेमी-डिजिटल क्लस्टर, लॉक करण्यायोग्य ग्लोव्हबॉक्स आणि बरेच काही यात मिळेल.
त्याबदल्यात जिम्नीला एलईडी हेडलाइट्स, हेडलाइट वॉशर, कीलेस एंट्री, पुश-बटण स्टार्ट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्लेसह ९ इंची टचस्क्रीन सिस्टम आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.