सकाळ डिजिटल टीम
देवकुंड धबधबा भिरा, रायगड येथे कुंडलिका नदीवर आहे. देवकुंड धबधब्याची ऊंची २७०० फुट आहे. हा रायगड जिल्ह्यातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक ट्रेकिंग आणि कॅम्पिंग धबधबा आहे. पुण्यापासून साधारण 100km आहे.
कुंभे हे गावाचं नाव आहे तेच नाव या धबधब्याला देण्यात आले. कुंभे हे सह्याद्री च्या कुशीत, अगदी उंचावर वसलेला धबधबा आहे. पुण्यापासून साधारण 115km अंतरावर आहे.
रायगड जिल्ह्यातील हा धबधबा आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत लपलेला या धबधब्या बद्दल पर्यटकांना अजूनही जास्त काही माहित नाही. पुण्यापासून 94km अंतरावर आहे.
महाराष्ट्राला लाभलेलं एक नैसर्गिक वरदान, सह्याद्रीच्या डोंगर माथ्यामध्ये वसलेलं हे स्थळ पावसाळ्यात लोकांना आपल्याकडे जणू आकर्षित करीत असते. ताम्हिणी घाटातील रहस्यमय धबधबा पुण्यापासून साधारण 67km आहे.
रायगड जिल्ह्यातील मोरझोत धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाच्या यादीत आहे. मोरझोत धबधबा पोलादपूरपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. हे उमरठपासून ४ किमी अंतरावर खोपड रस्त्यावर आहे. तर पुण्यापासून साधारण 158km अंतरावर आहे
रायगड जिल्ह्यातील महाडजवळील मांडले धबधबा हा सुंदर भातशेती आणि उंच टेकड्यांमधला ७० फूट उंच धबधबा आहे. पुण्यापासून साधारण 134km आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.