धनश्री भावसार-बगाडे
साधारण मे महिन्यात सुरू झालेले लग्नाचे मुहूर्त जून, जुलैपर्यंत असतात.
पावसाळ्यातले लग्न म्हणजे वऱ्हाडींच्या कपाळावर आठ्या आणणारेच असते.
लग्न म्हटले की, महागडे कपडे, मेकअप, चपाला या सगळ्यावरच पावसाळा पाणी फिरवतो. आणि उरते ती फक्त काळजी, पाऊस पडला तर कपडे, मेकअप खराब होण्याची.
तुमच्या याच चिंतांवरचे सोल्युशन आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्ही निश्चिंत लग्न अटेंड करू शकाल.
लग्न म्हटले की, नटणे मुरडणे आलेच. पण पावसाळ्यातल्या लग्नात भरजरी, काठापदराच्या साड्या, कपडे न घालता वजनाला हलके आणि सहज सुकतील अशा सिंथेटीक आकर्षक कपड्यांची निवड करावी.
पावसाळ्यातील लग्नांना जाताना बन हेअरस्टाइल शक्यतोवर टाळावी. केसात पाणी गेल्यास हेअरस्टाइल तर खराब होतेच शिवाय केसही लवकर सुकत नाहीत. याऐवजी मोकळे केस, हाफ पोनी असे प्रकार ट्राय करा.
हे तर उघडच आहे की, पावसाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप करणे कधीही फायद्याचे ठरते. त्यातही लायनर, मस्कारा, काजळ सारखे कॉस्मेटिक्सतर वॉटरप्रूफच घ्यावे.
पावसाळ्यात सगळीकडे पाणी असल्याने सटकण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टाइलिश पण कंफरटेबल आणि चांगली ग्रीप असणारी चप्पल निवडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.