रोहित कणसे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी प्रकला वांगमयी हिचा विवाह अत्यंत साध्या समारंभात पार पडला आहे.
बेंगळूरच्या हॉटेलात झालेल्या या लग्नात एकही व्हिआयपी व्यक्ती सहभागी नव्हता.
सध्या हे लग्न त्याच्या साधेपणामुले सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार अर्थमंत्र्यांची मुलगी वांगमयी मिंट लाउंजच्या बुक आणि कल्चर विभागासाठी फीचर रायटर म्हणून काम करते.
सीतारामन यांची मुलगी परकला आणि प्रतीक दोशी यांचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या उपस्थितीत झाला.
सीतारमन यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांचे मुलीसोबतचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
सीतारामन यांचे जावई प्रतीक हे 2014 पासून पीएमओशी संबंधित असून दोशी हे मूळचे गुजरातचे असून ते पीएमओमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.