अस्सल बावनकशी सोनं ! प्रीतीची विनेशसाठी खास पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

कुस्तीपटू विनेश फोगट वजन वाढल्यामुळे ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेच्या फायनलसाठी अपात्र ठरली. त्यामुळे सगळेचजण निराश झाले.

विनेश फोगट

विनेशला या गोष्टीचा जबर धक्का बसल्याच म्हंटल जातंय. विनेशला धीर देण्यासाठी बॉलिवूड कलाकार एकवटले आहेत.

प्रीती झिंटा

अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विनेशला पाठींबा दिला.

प्रीतीची पोस्ट

प्रीती तिच्या पोस्टमध्ये म्हणाली,"विनेश फोगट तू प्रत्येक भारतीयाला हवं असलेलं अस्सल बावनकशी सोनं आहे. चॅम्पियन्सची चॅम्पियन आणि सगळ्या भारतीय स्त्रियांची हिरो आहेस."

खंबीर उभी राहा

"पुन्हा उठ आणि खंबीरपणे उभी राहा. आयुष्य कायमच चांगलं असतं असं नाही. कठीण काळ जास्त काळ टिकत नाही पण कठीण लोक कायम पुढे जातात." असं प्रीती पुढे म्हणाली.

प्रितीने दिला धीर

"तुला एक घट्ट मिठी मारून आम्हाला तुझा किती अभिमान वाटतोय हे मला सांगता आलं असतं तर किती छान झालं असतं. पुन्हा खंबीरपणे उभी राहा . तुला यातून उभं राहण्याची शक्ती मिळो." अशी पोस्ट प्रितीने लिहिली.

सचिन यांनी शिकली उर्दू भाषा - येथे क्लिक करा