Shahneel Gill : भावाचं कौतूक पण बहिणीला शिव्या!

सकाळ डिजिटल टीम

आरसीबी आणि गुजरातचा जो सामना झाला त्यामध्ये जीटीनं विजय मिळवला. ज्याचं कौतूक अजुनही सोशल मीडियावर होतंय.

आरसीबीच्या विराट कोहलीनं शतक ठोकलं. त्यामुळे आऱसीबीनं मोठी धावसंख्या उभारली होती.

जेव्हा जीटीकडून शुभमन गिल बॅटिंगला आला तेव्हा त्यानं मात्र त्याच्या खेळीनं सगळ्यांना थक्क करुन सोडलं.

शुभमनच्या त्या खेळीनं सगळ चित्रचं बदलून टाकलं. त्यानं विराटच्या शतकाला जशास तसे उत्तर दिले.

शुभमनचं शतक सोशल मीडियावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला. त्यानंतर मात्र त्याच्यावर टीकाही करण्यात आली.

सोशल मीडियावरुन शुभमनच्या बहिणीला शहनीलचा नेटकऱ्यांनी शिवीगाळ केल्याचे दिसून आले.

शुभमनमुळे आरसीबीचे स्वप्न भंगले. गेल्या सोळा वर्षापासून आरसीबी ही विजयाच्या प्रतिक्षेत होती. यावेळी त्यांची निराशा झाली.

काही नेटकऱ्यांनी मात्र ज्यांनी शुभमनच्या बहिणीवर टीका केली आहे त्यांची समजूत घातली आहे.

आता जीटीचा सामना चैन्नई सुपर किंग्जसोबत होणार आहे. अर्थात त्यांना फायनलसाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahneel Gill