रुपेश नामदास
शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे, मात्र अजून तो मंजूर करण्यात आला नाही.
देशातील अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी फोन करून शरद पवारांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.
शरद पवारांचा राजीनामा मंजूर झाला तर राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असा प्रश्न सतत विचारला जातो.
जर शरद पवारांनी राजीनामा दिला तर भाजपला थेट फायदा होवू शकतो.
महाराष्ट्रात शरद पवारांनी शिवसेना-काँग्रस-राष्ट्रवादी अशा तिन पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन केली, जर शरद पवारांनी राजीनामा दिला तर मविआमध्ये ताळमेळ राहणार नाही.
२०२४ ची लोकसभेची निवडणुक तोंडावर असताना भाजप विरोधी मोठी आघाडी उभी शरद पवारच करू शकतात. विरोधकांना एकत्र आणण्याची त्यांना उत्तम कला आहे.
राज्यात मविआचं वातावरण पाहिला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा मविआचं सरकार येवू शकतं. मात्र शरद पवारांचा पुढाकार असेल तर.
महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी जर अध्यक्ष पद सोडलं तर नव्य अध्यक्षांच्या अधिपत्याखाली किती नेते काम करतील याची शाश्वती नाही. किंवा काही नेते पक्ष सोडण्याचा विचार देखील करू शकतात. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा जरी राजीनामा दिला तरी देखील देशाच्या राजकारणावर परिणाम होवू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.