सकाळ डिजिटल टीम
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी श्री अंबाबाई देवीची श्री कामाक्षीदेवी (कांचीपुरम) स्वरूपातील पूजा बांधली होती. श्रीपूजक आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, चैतन्य मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी ही पूजा बांधली. (फोटो - मोहन मेस्त्री)
छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी देवीची मंगळवारी गजारूढ रूपातील पूजा बांधली.
नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी त्र्यंबोली देवीची कमल पुष्पातील सालंकृत पूजा. रोहित गुरव, ओंकार गुरव व सदानंद गुरव यांनी ही पूजा बांधली.
राशिवडे : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी येथील देवीची करवीर निवासिनी अंबाबाईच्या रूपात बांधलेली पूजा. (फोटो - राजू कुलकर्णी)
कोडोली (ता. पन्हाळा) : येथील अंबाबाई मंदिरातील मूर्तीची शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मीनाक्षी देवी रूपात बांधलेली सालंकृत पूजा.
पन्हाळा : येथील श्री अंबाबाईची तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी रूपातील खडी पूजा.(फोटो - धीरज कुराडे, पन्हाळा)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.