रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम! Health Tips

Aishwarya Musale

असे अनेक लोक असतात ज्यांना सकाळी सर्वात आधी चहा प्यायला आवडतो. चहाशिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही, असे त्यांना वाटते.

tea | sakal

पण रिकाम्या पोटी आणि शिळ्या तोंडाने चहा पिणे योग्य आहे का? रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

tea | sakal

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस-अॅसिडिटीची समस्या वाढते. जर तुम्ही नियमितपणे असे करत असाल तर तुमच्या पोटात अॅसिडचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते.

tea | sakal

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता आणि शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढू शकते.

tea | sakal

सकाळी चहा पिण्यापूर्वी कोमट पाणी पिणे किती वेळ योग्य आहे, या प्रश्नाने अनेकजण संभ्रमात असतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी चहा पिण्याच्या 10-15 मिनिटे आधी पाणी पिणे योग्य मानले जाते.

tea | sakal

असे केल्याने चहाचा अम्लीय परिणाम शरीरावर खूप कमी होतो. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये याची विशेष काळजी घ्या.

tea | sakal

चहा प्यायल्यानंतर पाणी प्यावंसं वाटत असेल तर साधारण अर्धा तास वेळ द्या. यानंतरच तुम्ही पाणी प्या किंवा काही थंड पदार्थ किंवा फळे खा.

tea | sakal

तसे न केल्यास दात किडणे किंवा सर्दीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दिवसभरात किती चहा प्यावा याबद्दलही अनेकजण संभ्रमात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea | sakal