तेलकट त्वचेला उपयुक्त, नारळ पाणी! या प्रकारे लावा चेहऱ्यावर Coconut Water

Aishwarya Musale

नारळ पाणी

नारळ पाणी केवळ आपल्याला हायड्रेटेड ठेवण्याचे काम करत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत, तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नारळ पाणी वापरायला हवे.

coconut water | sakal

तेलकट त्वचा

उन्हाळ्यात नारळ पाणी तेलकट त्वचेसाठी कसं उपयोगात येऊ शकतं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तेलकट त्वचेवर नारळ पाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

coconut water | sakal

फेस मास्क

फेस मास्क म्हणून नारळाच्या पाण्याचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्याला हायड्रेशन मिळते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते, तुम्ही त्याचा मास्क सहज बनवू शकता.

coconut water | sakal

मध

त्यासाठी तुम्ही 2 चमचे नारळ पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा मध आणि हळद पावडर घाला आणि ते चांगले मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा, लावल्यानंतर दहा मिनिटांनी धुवा.

coconut water | sakal

फेस वॉश

तेलकट त्वचेसाठी आपण फेस वॉश म्हणून नारळ पाणी देखील वापरू शकता. नारळ पाणी तेलकट त्वचा काढून टाकण्याचे काम करते.

coconut water | sakal

मसाज करा

चेहऱ्यावर शिंपडलेल्या नारळाच्या पाण्याने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा, असे नियमित केल्याने तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल.

coconut water | sakal

टोनर

तुम्ही नारळाचे पाणी टोनर म्हणून, क्लिंजर म्हणूनही वापरू शकता, तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता, तसेच टोनर म्हणून तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करू शकता.

coconut water | sakal

नॅचरल टोनर

या नॅचरल टोनरमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत आणि तुमची त्वचा चमकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

coconut water | sakal