मेकअप काढण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!

Aishwarya Musale

जसे तुम्ही रोज सकाळी मेकअप करता, त्याचप्रमाणे तो मेकअप रात्री झोपायच्या आधी काढणे महत्त्वाचे आहे. मेकअप काढण्यासाठी आपण मेकअप रिमूव्हरचा वापर करता. 

आजकाल मेकअप प्रोडक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकलयुक्त प्रोडक्टस आपल्या स्किनला हानी पोहचवण्याचं काम करतात.

मग आपल्या चेहऱ्यावर, डाग, पिंपल्स अशा समस्या निर्माण होताना दिसतात. त्यात मेकअप लावणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच मेकअप काढणं देखील महत्त्वाचं असतं.

बहुतेक महिला मेकअप नीट काढत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर तो तसाच राहून जातो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या निर्माण होतात.

नारळ तेल

नारळाच्या तेलापासून तुम्ही मेकअप रिमूव्हर बनवू शकता. यासाठी नारळाचं तेल घ्या आणि त्यामध्ये गव्हाचा कोंडा, लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब मिक्स करा.

नंतर हे तयार झालेले मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांनंतर तुमचा चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचा मेकअप रिमूव्ह होईल.

ओट्स आणि दही

दही आणि ओट्सपासून तुम्ही रिमूव्हर बनवू शकता. यासाठी दही घ्या आणि त्यामध्ये बदाम पावडर, ओट्स मिक्स करा.

तयार झालेली पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि नीट मसाज करा. त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा मेकअप सहज रिमूव्ह होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.