Aishwarya Musale
आजच्या काळात डोकेदुखी ही लोकांची सामान्य समस्या बनली आहे.
काही वेळा सकाळी उठल्यानंतर काही लोकांना डोकेदुखी सुरू होते. ज्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ राहावे लागते.
अनेकदा डोकेदुखी इतकी वाढते की ना खाणे-पिणे आवडते, ना काही काम करावेसे वाटते. खरं तर अनेकवेळा डोकेदुखीची अनेक कारणं असतात. याचं कारण तुमचं जेवणही असू शकतं.
आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. आपल्या आहारात त्यांचा समावेश करा.
जर तुम्हाला डोकेदुखीची तक्रार असेल तर सफरचंद हा या समस्येवर उपाय आहे. म्हणजेच आपल्या आहारात फळांमध्ये सफरचंदांचा समावेश करा.
जर तुम्ही रोज सफरचंद खाल्ले तर डोकेदुखीची समस्या हळूहळू कमी होऊ लागेल. सफरचंदात असलेल्या पोटॅशियममुळे डोकेदुखी दूर होते.
जर तुम्ही दररोज डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर आपल्या आहारात दही किंवा ताक खाण्यास सुरुवात करा. याचे सेवन केल्याने डोकेदुखी दूर होऊ शकते.
शरीराला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. अशा वेळी नारळाचे पाणी खूप फायदेशीर ठरते. नारळाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीची समस्याही दूर होते. नारळ पाणी हे पोषक तत्वांचे भांडार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.