सकाळ डिजिटल टीम
गायक सोनू निगम याच्यावर मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान हल्ला झाला. त्यानंतर या घटनेचा सोशल मीडियावर त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे पुत्र स्वप्नील फातर्पेकर यांच्यावर सोनू निगमला धक्काबुक्की करण्याचा आरोप आहे.
सोनू निगम हा त्याच्या खास आवाजाच्या जोरावर चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. तरुणांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत त्याच्या गाण्याचे चाहते आहेत.
सोनू निगमच्या आवाजाचे जगभरात हजारो चहाते आहेत, त्याच्या गाण्यांची यादी पाहिली तरी तुम्हाला देखील नॉस्टेलजिया फील झाल्या शिवाय राहाणार नाही.
सोनू निगमने गायलेली गाणी आठवताना संदेसे आते है हे बॉर्डर चित्रपटातील गाणं सर्वात आधी आठवतं . ९० च्या दशकात जन्मलेल्या सगळ्यांना हे गाणं पाठ असेल...
तसेच मै ऐसा ही हूं चित्रपटातील पापा मेरे पापा हे गाणं देखील अनेकांच्या आठवणींना नक्कीच पुन्हा जीवंत करेल.
भी मुझमें कही, थोडी... तसंच हे मैं हू ना चित्रपटातील तुमसे मिलके दिल का.. हे गाणी देखील अनेकांच्या फेवरेट लिस्ट मध्ये आहेत.
आपल्यापैकी कितीतरी मुलींनी बोले चुडींया या गाण्यावर डान्स केला असेल ते देखील सोनूनेच गायलं आहे.
तुमसे मिलके.., नो एंट्री, कभी खुशी कभी गम, मुझसे शादी करोगी.. अशी सोनूने गायलेल्या हीट गाण्यांची यादी मोठी आहे..
सोनू निगम हे नाव त्याच्या गाण्यांच्या माध्यामातून श्रोत्यांच्या मनात कायम राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.