साक्षी राऊत
कमी कॅलरीचे जेवण केमस वजन कमी होते, आणि पोटसुद्धा हलके राहते. तेव्हा डाएटमध्ये कमी कॅलरीचे जेवण प्रेफर करा.
पोटावरील चरबी कमी करायची असेल तर व्हाइट शुगर तुमच्या डाएटमधून वगळा.
लवकर प्रभावी पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर मैदा, ब्रेड, बर्गर, पिझ्झा यांसारखे रिफाइंड कार्ब्स, प्रोसेस्ड फूड अजिबात खाऊ नका. यात पोषक तत्व अगजीच कमी असतात.
तुमच्या रोजच्या जेवणात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. हे घटक शरीराला पोषक तत्व पुरवता आणि यात कॅलरीजही मर्यादित प्रमाणात असतात.
डाएटमध्ये लीन प्रोटीन मासे, नट्स, सीड्स घेतल्यास दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. आणि वजनही कमी होण्यास मदत होते.
डाएट किती हेल्दी असेल आणि तुम्ही फिजीकली अॅक्टिव्ह नसाल तर वजन कमी होणार नाही. तेव्हा एक्सरसाइज किंवा वर्कआउट करा.
ब्रिस्क वॉक करणे, धावणे, सायकल चालवणे, हाय इंटेंसिटीच्या एक्सरसाइज केल्यास चरबी कमी होण्यास मदत होते.
चक्रासन, भुजंगासनसह असे अनेक आसन आहेत जे पोटाची चरबी कमी करताच. शिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत.
पेटाची चरबी वितळण्यास थोडा वेळ लागतो. वरील या काही नियमाचं काटेकोरपणे पालन केले तर तुमचे वजन महिन्याभरात कमी होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.