Aishwarya Musale
मुलींना फॅशनच्या बाबतीत नेहमीच अव्वल राहायचे असते, त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आउटफिट कलेक्शन असतात. इतके पर्याय असूनही तिला नेहमी संभ्रम असतो की, आज काय घालायचे?
पण आज आम्ही तुम्हाला अशा काही फॅशन टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची समस्या पूर्णपणे दूर होणार नाही पण काही प्रमाणात ती नक्कीच कमी होईल.
जर तुम्हाला खरच स्टायलिश दिसायला आवडत असेल तर तुम्ही नवनवीन प्रयोग करत राहायला हवे. आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची स्टाइल अधिक चांगली होईल.
आजकाल प्रत्येक मुलीला वेस्टर्न ड्रेस घालायला आवडतो. बॉडीकॉन किंवा मॅक्सी ड्रेससह वेगवेगळ्या स्टाइलचे बेल्ट वापरून तुम्ही स्टाइल मिळवू शकता.
मुलींना बर्याचदा शॉर्ट्स आणि टी-शर्ट घालणे आवडते, उन्हाळ्याच्या हंगामात हा एक अतिशय आरामदायक पोशाख असतो. तुम्ही तुमच्या टी-शर्टशी जुळणारा शर्ट कॅरी करू शकता.
ऑफिसमध्ये कूल लुक मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगांची ट्राउझर्स कॅरी करू शकता. आजकाल अशी अनेक पँट आहेत, जी प्लाझो लूकची आहेत, ती दिसायला स्टायलिश आहेत.
मस्त दिसण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची जॅकेट्स उपलब्ध आहेत. जे तुम्हाला सामान्यतः क्लासी लुक देते ते म्हणजे जॅकेट. कुर्ती, टॉप, शर्टसोबत कधीही कॅरी करू शकता.
कॅज्युअल्ससह स्टायलिश लूक कसा मिळवायचा हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न असतो. जर तुम्ही या जीन्स कोणत्याही प्रकारच्या बॉडीकॉन टॉपसह कॅरी केल्यात तर तुम्ही अगदी कमाल दिसाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.