सकाळ डिजिटल टीम
लव्हेंडर
लव्हेंडर हे सर्वाधिक लोकप्रिय सुगंधित रोपांपैकी एक आहे. एका पॉटमध्ये लव्हेंडरचे रोप लावून बेडरूममध्ये ठेवल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळेल.
काय असतात फायदे?
लव्हेंडरच्या रोपामुळे झोप चांगली येते, चिडचिडेपणा कमी होतो आणि हृदयाचे वाढलेले ठोके देखील नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
मनी प्लांट
घरातील हवा शुद्ध करण्याचे कार्य हे रोप करते.
चमेलीचे रोप
चमेली फुलाच्या सुगंधामुळे मेंदू आणि मन शांत होण्यास मदत मिळते
रोझमेरीचे रोप
घरातील अशुद्ध हवा शुद्ध करण्याचे कार्य हे रोप करते. यामुळे तुमचा मूड देखील चांगला राहण्यास मदत मिळते.
कोरफड
एका अभ्यासातील माहितीनुसार हवा शुद्ध करणाऱ्या औषधी वनस्पतींपैकी कोरफड देखील एक आहे.
पीस लीली
हे रोप अॅलर्जी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा खात्मा करण्याचे कार्य करते. यामुळे सर्दी-खोकल्याचीही समस्या कमी होण्यास मदत मिळते.
व्हेलेरियन
या फुलामुळे चिंता व ताणतणावाची समस्या कमी होण्यास मदत मिळते. बेडरूममध्ये हे रोप ठेवल्यास झोप देखील चांगली मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.