Aishwarya Musale
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी फेस स्क्रब करणे गरजेचे असते. स्क्रब चेहऱ्याला डीप क्लींज करते आणि उजळपणा आणण्यासाठी मदत करते. अशामध्ये तुम्ही घरी तयार केलेले स्क्रब वापरू शकता.
आज आम्ही तुम्हाला बदाम आणि दह्यापासून फेस स्क्रब कसे तयार करावे हे सांगणार आहोत. हे स्क्रब तुमच्या त्वचेला खोलपर्यंत साफ करेल आणि चेहरा उजळ बनवेल.
बदाममध्ये व्हिटॅमिन ई सोबत कित्येक पोषक तत्व समाविष्ट असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. बदाम-दहीचे स्क्रब त्वचेमध्ये साचलेली घाण साफ करतो.
बदाम-दहीचे स्क्रब वापरून तुम्ही त्वचा साफ करू शकता. हे स्क्रब कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
स्क्रब बनविण्यासाठी तुम्हाला बदाम, दही आणि बदाम तेल लागेल. बदाम वाटून घ्या. कॉटनच्या कापडातून दही गाळून त्यातले पाणी बाजूला करा.
दही मिसळून घेतल्यानंतर त्यात एक चमचा तेल टाका. त्यामध्ये वाटलेल्या बदामाची पेस्ट टाकून व्यवस्थित मिसळून घ्या. तुमचा फेस स्क्रब तयार आहे.
हा फेस स्क्रब वापरण्यापूर्वी चेहरा माईल्ड फेसवॉशने धुवून घ्या. चेहारा साफ केल्यानंतर कापडाने व्यवस्थित पूसून घ्या आणि त्यानंतर स्क्रब करा.
चेहरा साफ केल्यानंतर स्क्रब लावून चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा. ५ मिनिटांपर्यंत हे स्क्रब चेहऱ्यावर ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.