Vaibhav Mane
वैचारिक किडा म्हणजे दोन मराठी तरुणांनी लोकांसाठी चालवलेली वैचारिक चळवळ.
वैचारिक किड्याचे वेगळेपण काय ?
आपण अनेकदा व्यवसायाबद्दल किंवा नकारात्मकतेबद्दल वाचून समजून सांगणारे अनेक जण पाहतो, पण..
वैचारिक किडा या व्यासपीठावरती ज्यांनी तो प्रॉब्लेम ऍक्च्युली अनुभवला तो तिथे येऊन स्वतःचे अनुभव सांगतो, ज्यातून लोकांना धडे मिळतात.
वैचारिक कीडा चे व्हिडिओ बघितल्यामुळे काहींनी आत्महत्या करण्याचा निर्णय माघार घेतला आहे .
पण तुमच्या मनात प्रश्न पडला असेल वैचारिक कीडा नेमकं कोण - कोण चालवतात ?
मराठी किडा ते वैचारिक किडा हा प्रवास नेमका कसा झाला ?
सुरज आणि प्रशांत यांचं नातं काय आहे हे तुम्हाला माहित आहे का ? या दोन मराठी तरुणांचे शिक्षण तुम्हाला माहित आहे का ?
निखळ धुतल्या तांदळासारख्या मैत्रीचा अनुभव खूप कमी लोकांना येतो. प्रोफेशनल निखळ मैत्रीचं उदाहरण म्हणजे सुरज आणि प्रशांत
कोणतीही मुलाखत वाहत्या पाण्यासाखी सहज,सरळ करण्यासाठी काय प्रयत्न केले ? असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, कोणाला लहान मोठं ट्रीट न करता माणसासारख ट्रीट केलंय. इतकचं..आणि हाचं यशस्वी मुलाखतीचा मंत्र आहे.
बारा वर्षापासून दोघे जीवाभावाचे मित्र आहेत. प्रशांत चे महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेजमधून पूर्ण झाले .
सुरजचे महाविद्यालयीन शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातून पूर्ण झाले.
नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती सुरजने घेतल्या आहेत.त्याच्या बोलण्यातली सहजता हीच त्या यशस्वी युट्युबरच कारण असावे
प्रशांत आणि सुरज चे डिजिटल मीडियातले करिअर हे अनेकांसाठी प्रेरणा आहे. प्रशांत आणि सुरज दोघेही पुण्याचे आहेत . ते दोघे पुढील दोन यूट्यूब चॅनेल चालवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.