धनश्री भावसार-बगाडे
हिंदू धर्मातला महत्वाचा म्हणून वट सावित्री पौर्णिमा हा सण समजला जातो. सौभाग्यवतींचा लाडका सण असतो.
या खास सणाला महिलांचा उत्साहदेखी दांडगाच असतो. त्यामुळे यावेळी दारात, देवापुढे विशेष रांगोळी काढण्यासाठी या खास डिझाइन्स.
वट सावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्याचं महत्व आहे. वडाला जसं दीर्घायुष्य असतं, तसं पतीला मिळावं अशी कामना केली जाते.
यावेळी सौभाग्यवती महिला साजश्रृंगार करून वडाला पूजतात.
महिला वडाच्या झाडाला धागा बांधून त्या धाग्याचे ७ वेढे फेऱ्या मारून गुंढाळले जातात. या धाग्याप्रमाणे ७ जन्मासाठी याच पतीशी बंधन बांधले जावे अशी प्रार्थना केली जाते.
यामागे पुणारात सत्यवान आणि सावित्रीची कथा सांगितली जाते.
सत्यवानाचा मृत्यू झाला तेव्हा शोकाकूल सावित्रीने यमराजाशी भांडून आपल्या पतीचे प्राण परत आणले असे सांगितले जाते.
यासाठी सावित्रीने वडाच्या झाडाखाली बसूनच कठोर तप करून यमाचा सामना केल्याचं सांगतिलं जातं. म्हणून या दिवशी वड पूजण्याला विशेष महत्व आहे.
अशा विशेष दिवशी तुम्ही अशाच आकर्षक डिझाइन्सने रांगोळी काढून तुमचा सण साजरा करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.