युगंधर ताजणे
गेल्या काही महिन्यात जे चित्रपट किंवा मालिका प्रदर्शित झाल्या आहेत. त्यात सगळ्यात चर्चेतील चित्रपट म्हणून विदूथलाई या चित्रपटाचे नाव घ्याले लागेल.
विजय सेतुपति, सुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची जोरदार प्रसिद्धी मिळवली आहे.
वेगळ्या धाटणीच्या या चित्रपटामध्ये पोलीस प्रशासन आणि बेडर, निर्दयी विभाजनवादी व्यक्तींचा प्रभावी संघर्ष आपल्यासमोर उभा करण्यात आहे.
चित्रपट एक ज्वलंत विषय आपल्यासमोर ठेवतो. त्यामुळे प्रेक्षक त्यात पूर्णपणे गुंतून जातो. त्याचे श्रेय दिग्दर्शक वेटरीमारन यांना द्यावे लागेल.
सध्या झी ५ ओटीटीवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल. हा चित्रपट हिंदी वगळता बाकीच्या दक्षिणेकडील सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे.
सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट यामधील संघर्ष प्रेक्षकांपुढे खूप सारे प्रश्न उभे कऱणारा आहे.
समाजात अजूनही आपण कोणत्या मानसिकतेत राहतो आणि त्यावर कशापद्धतीनं विचार करतो हे अतिशय प्रभावीपणे या चित्रपटातून समोर येते.
सोशल मीडियावर विदुथलाई वर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याला पसंती दर्शवली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.