Harshada Shirsekar
तूप आणि गूळ एकत्रित खाल्ल्याने बॉडी टोनिंग होण्याच्या प्रक्रियेत खूप मदत मिळते.
हाडांच्या वेदनांतून सुटका मिळवायची असेल तर तूप व गुळाचे सेवन करू शकता.
पोट स्वच्छ होत नसेल तर तूप व गुळाचे सेवन करावे. कारण यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
गूळ व तुपाचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास मूड फ्रेश राहण्यास मदत मिळू शकते. कारण यातील औषधी गुणधर्मामुळे चिंता, ताणतणाव यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.
गूळ व तुपाचे एकत्रित सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.
मासिक पाळीदरम्यान पोट व ओटीपोटामध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळण्यास मदत मिळू शकते.
तूप व गुळातील औषधी गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
तूप व गुळाचे ड्रिंक करून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.