काय आहे 'चॉकलेट मेडिटेशन', जाणून घ्या फायदे आणि पद्धत!

Aishwarya Musale

ध्यानाचा समावेश करून तुमच्या दैनंदिन दिनचर्येत तुम्ही अनेक प्रकारे फायदे मिळवू शकता. ध्यान आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्ही असंख्य वेळा ऐकले असेल.

तुम्ही आतापर्यंत सामान्य ध्यानाबद्दल ऐकले असेल, परंतु आम्ही तुम्हाला आज चॉकलेट मेडिटेशनबद्दल सांगणार आहोत. यामध्ये चॉकलेटची चव अनुभवताना ध्यान करावे लागते. चॉकलेट मेडिटेशन ही एक प्रकारची थेरपी आहे, जी वजन नियंत्रणात ठेवते, मन शांत करते.

चॉकलेट ध्यान प्रक्रिया


सर्वप्रथम असे चॉकलेट निवडा, ज्याची चव अप्रतिम असेल. आता शांत आणि स्वच्छ जागा निवडा. तुमच्यासोबत आरामशीर आसन घ्या.

आता खाली बसून हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपल्या हातात चॉकलेट धरा आणि त्याचा सुगंध आणि चव अनुभवा. 

एक छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि त्याची चव अनुभवा. ते तोंडात विरघळू द्या.

चॉकलेट खाल्ल्यानंतरही ध्यान करत राहा. आपले लक्ष त्याकडे असले पाहिजे. तुमचे विचार फक्त चॉकलेट आणि त्याची चव यावर केंद्रित ठेवा.

चॉकलेट ध्यानाचे फायदे


अनेक प्रकारचे चॉकलेट मेडिटेशनवर संशोधन झाले आहे. हा एक ध्यानासाठी चांगला पर्याय असू शकतो. त्याचे अनेक फायदे संशोधनात समोर आले आहेत. योग आणि ध्यानाप्रमाणे ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

ही एक अद्भुत प्रक्रिया आहे. यामध्ये चॉकलेटची चव अनुभवताना ध्यान करावे लागते. काही लोक याला माइंडफुलनेस मेडिटेशन असेही म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.