Dinkache Ladoo : हिवाळ्यात डिंकाचे लाडू का खावेत?

सकाळ डिजिटल टीम

हिवाळा सुरू झाला, की घराघरात डिंकाचे लाडू बनवण्याची लगबग सुरु होते.

हिवाळ्यातच डिकांचे लाडू का खावे, चला तर जाणून घ्या

पुर्वीच्या काळापासून डिंकाचा वापर पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी केला जात आहे.

डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट्स, सौंदर्य उत्पादने, एनर्जी ड्रिंक यामध्ये देखील करण्यात येतो.

डिंक उष्ण असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

त्यामुळेच हिवाळा सुरू झाला की घराघरांमध्ये डिंकाचे लाडू तयार करण्यात येतात.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

डिंक पाठीच्या हाडाला मजबूत बनवतं. याशिवाय डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते.

डिंकाचे लाडू उष्ण असतात,त्यामुळे ते जपून खावेत. दोनपेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dinkache Ladoo | sakal