वर्ल्ड कपची ट्रॉफी पोहोचली थेट ताजमहालात, बघा सॉलीड फोटोशूट

साक्षी राऊत

१८ देशांचा प्रवास

१८ देशांमध्ये ही ट्रॉफी फिरवल्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप २०२३ ची ट्रॉफी ताजमहालात पोहोचली. ताजमहालात या ट्रॉफीचे १ तास फोटोशूट झाले.

world cup trophy

सील्वर आणि गोल्डन रंगाच्या या आयसीसी ट्रॉफीचे डिझाइन लंडनच्या पॉल मॉर्डसेन ऑफ गार्ड अँड कंपनीने तयार केले आहे.

world cup trophy

वनडे वर्ल्ड कप

वनडे वर्ल्ड कप मॅचेस १२ वर्षांनी भारतात 10 शहरांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

world cup trophy

फोटोशूटदरम्यान ताजमहालात ट्रॉफी बघण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली. पर्यटक ट्रॉफीसोबत सेल्फी घेण्यासाठी आतूर होते.

world cup trophy

अंतराळात अनावरण

या ट्रॉफीला अमेरिकेने प्रायव्हेट स्पेस एजंसीच्या मदतीने बलूनने अंतराळात पाठवले होते.अंतराळात या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

world cup trophy

ट्रॉफीचे लँडिंग

त्यानंतर अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदीं स्टेडियममध्ये ट्रॉफी लँड करण्यात आली. त्यानंतर १८ देशांचा प्रवास करून ही ट्रॉफी भारतात पोहोचली.

world cup trophy

ही ट्रॉफी भारताच्या वेगवेगळ्या भागात फिरवण्यात येणार असून या ट्रॉफीचा प्रवास ४ सप्टेंबरला संपेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

world cup trophy