नमिता धुरी
सध्याची जीवनशैली पाहाता झोप न येण्याची समस्या अनेकांना जाणवते. अशा वेळी काही योगासने करणे आवश्यक आहे.
बालासन केल्याने मेंदू शांत होतो.
हे आसन करण्यासाठई वज्रासनात बसा. शरीर पुढे घेऊन जाऊन डोकं जमिनीला टेकवा आणि दोन्ही हात समोर सरळ सोडा.
शवासनामुळे स्नायूंना आराम मिळतो.
यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही हातांचे तळवे वरच्या बाजूला ठेवा आणि डोळे बंद करून घ्या.
उत्तानासनामुळे मानसिक शांतता मिळते.
यासाठी सरळ उभे राहा. श्वास घेऊन दोन्ही हात वर करा. श्वास सोडत खाली जा आणि हातांनी पायांचे अंगठे धरा.
शलभासन करण्यासाठी पोटावर झोपा. दोन्ही हात मांडीच्या खाली ठेवा. पायांचे तळवे सरळ ठेवा आणि दोन्ही पाय वर उचला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.