नमिता धुरी
भुजंगासन
हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. हाताचे तळवे जमिनीला टेकवून खांदे वर उचला. पोट जमिनीजवळ ठेवा.
नौकासन
पाठीवर झोपा. पाय हवेत उचला आणि पाठ उचलून हात पायांना समांतर ठेवा.
मार्जारासन
हातांचे तळवे आणि गुडघे जमिनीला टेकवा. मान वर उचला आणि छाती पसरवा. त्यानंतर मान खाली झुकवून पाठ उंचवा.
ताडासन
पायांच्या बोटांवर उभे राहा आणि दोन्ही हात वर करून हातांच्या बोटे एकमेकांमध्ये जुळवत शरीराला ताण द्या.
चेअर पोझ
दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवून खुर्चीवर बसल्याप्रमाणे करा आणि दोन्ही हात वर उचला.
चक्रासन
पाठीवर झोपा. दोन्ही हातांची बोटे पायांच्या दिशेला येतील अशाप्रकारे हातांचे तळवे डोक्याच्या बाजूला ठेवा.
त्रिकोणासन
दोन्ही पाय एकमेकांपासून ठरावीक अंतरावर ठेवा. एका हाताने त्याच बाजूच्या पायाची बोटे पकडा आणि दुसरा हाता सरळ रेषेत वर उचला. मानही त्याच दिशेने वर उचला. असे दोन्ही बाजूंना करा.
शवासन
पाठीवर झोपा आणि शरीर सैल सोडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.