Aishwarya Musale
आपला मूड कसा आहे याचा फक्त आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आसपासच्या लोकांवरही परिणाम होतो.
म्हणजे तुम्ही छान, रिलॅक्स मूडमध्ये असाल तर सगळ्यांनाच आवडता पण जर तुमची सतत चिडचिड होत असेल, किंवा दु:खी रहात असाल तर लोक तुमच्यापासून दूर राहणंच पसंत करतात.
कधीकधी काही प्रॉब्लेम्समुळे मूड खराब होतो, पण खराब मूडची ही समस्या कायम असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे ठरते.
मूड चांगला ठेवण्यासाठी, दैनंदिन दिनचर्या तर सुधारायला हवीत पण त्यासोबतच काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.
शरीरात हॅपी हार्मोन्स वाढवायचे असतील तर डार्क चॉकलेट खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स आपला मूड सुधारण्यास मदत करतात. पण ते एका ठराविक प्रमाणातच खावे.
बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया यासारखे ड्रायफ्रुट्स आणि बिया यांचा आहारारत समावेश करावा.
मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पालकाचा आहारात समावेश करणे अतिशय फायदेशीर ठरते. पालक खाल्ल्याने सेरोटोनिनची पातळी सुधारते, ज्यामुळे मूड सुधारतो.
सफरचंद हे केवळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम नाही तर त्यामुळे आपला मूडही सुधारू शकतो. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील सफरचंदाचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.