आईशी संवाद : बेंबीचा फुगा - अंबीलीकल हर्निया

umbilical-hernia
umbilical-hernia
Updated on

बाळाची नाळ साधारतः जन्मानंतर आठव्या ते नवव्या दिवशी पडते, पण काही बाळांमध्ये बेंबीच्या जागी फुगवटा तयार होऊन त्याचा आकार कमीजास्त होतो. बाळ रडताना, हसताना, खोकताना, शी-शू करताना व कुठल्याही कारणाने पोटातील दाब वाढल्यास ही सूज वाढते. इतर वेळी तो कमी होतो. या फुगवट्यात येणाऱ्या आतड्यांचा भाग हा हाताने खाली ढकलता येतो. या फुगवट्याला ‘अंबीलीकल हर्निया’ म्हटले जाते.

जन्मतः बेंबीभोवतीचे स्नायू कमकुवत असल्याने हा हर्निया निर्माण होतो. बाळ मोठे होते तसे पोटांच्या स्नायूंची ताकत वाढल्यास हर्निया अपोआप कमी होतो. या फुगवट्याला उपचारांची गरज नसते. सहसा हर्निया बाळाच्या जन्माच्या सहा महिन्यांपर्यंत येतो व बहुतांश वेळा एक वर्षापर्यंत आपोआप नाहीसा होतो. काही अंबीलीकल हर्निया पाच वर्षांपर्यंत नाहीसे होतात.

चुकीच्या उपचाराने अपायाची शक्यता
गैरसमजापोटी फुगवटा कापड किंवा चिकटपट्टीने बांधणे, त्यावर नाणे लावून बांधणे, पट्टा बांधणे असे चुकीचे व गरज नसलेले उपाय केले जातात. याची गरज नसते. फायदाही होत नाही व त्याने अनावश्यक गुंतागुंतही निर्माण होते. 

शस्त्रक्रियेची गरज केव्हा? 
 पाच वर्षांपर्यंत सूज न गेल्यास 
 हर्नियात आतडी अडकल्यास

आतडी या फुगवट्यात अडकल्याची लक्षणे
आधी फुगवट्यातील मागे जाणारी आतडी आता जात नाहीत. 
फुगवटा कडक होतो. 
फुगवट्याची जागा लाल, निळी, काळी पडते. 
बाळ सतत रडते व काही खात, पीत नाही. 
फणफणून ताप येतो. 
ही लक्षणे अढळल्यास तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.