कधी ज्यूस करण्यासाठी, सॅलड करण्यासाठी किंवा इतर कोणत्या पदार्थासाठी फळं किंवा काही भाज्या सोलाव्या लागतात.
कधी ज्यूस करण्यासाठी, सॅलड करण्यासाठी किंवा इतर कोणत्या पदार्थासाठी फळं किंवा काही भाज्या सोलाव्या लागतात. त्यासाठी नवीन पद्धतीचे सोलाणे उपलब्ध असले, तरी फळ, किंवा फळभाजी सोलल्यानंतर त्याची सालं खाली पडतात आणि ती गोळा करणं हे एक वेगळंच काम होऊन जातं. अनेकदा ती सालं खाली पडत असल्यामुळे सोलण्याचं कामही नीट होत नाही. या गोष्टीवर उतारा आहे पीलर विथ कंटेनर या गॅजेटचा. यामध्ये सोलण्याबरोबरच सालं गोळाही केली जातात.
शिवाय त्याचं डिझाईनच अशा पद्धतीचं करण्यात आलेलं असतं, की सोलण्याचं काम एकदम जलद होऊन जातं. सगळी सालं उपकरणात एकत्र होत असल्यामुळे ती कचऱ्यात टाकणं किंवा विल्हेवाट लावणं एकदम सोपं होऊन जातं. अनेक भाज्यांच्या सालांची चटणी वगैरे करतात. त्यासाठीही हे उपकरण एकदम परफेक्ट आहे.
पीलर विथ कंटेनरची वैशिष्ट्ये
चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकपासून तयार झालेलं असल्यामुळे टिकाऊ.
हँडलच्या विशिष्ट डिझाईनमुळे काम जलद पद्धतीनं करण्याची सुविधा
कुठेही ठेवता येतं, कुठेही नेता येतं.
ब्लेड्स बदलता येतात.
स्वच्छ करण्यासाठी एकदम सोपं.
पिकनिकसाठी नेण्यासाठी एकदम योग्य उपकरण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.