मेमॉयर्स : आईच्या आदरश्यानेच वाटचाल

Prajakta-Mali
Prajakta-Mali
Updated on

प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, असं प्रत्येक आईला वाटत असतं. तशीच इच्छा माझ्या आईचीही होती.

त्यामुळेच, मी अवघ्या सहा वर्षांची असताना शास्त्रीय नृत्याचे धडे घेण्यासाठी तिनं प्रशिक्षणाला पाठवलं. मी तिच्यामुळेच भरतनाट्यम शिकले. मी नृत्यामध्ये नाव कमवून मोठी अभिनेत्री व्हावं, अशी आईची इच्छा होती. त्यासाठी ती मार्गदर्शनही करत होती. तिच्यामुळेच मला नृत्य अन् अभिनयाची आवड लागली. त्यामुळे मी ऑडिशन देऊ लागले अन् मला अतिशय उत्कृष्ट मालिका अन् चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याचबरोबर नृत्यामध्येही मी नाव कमावलं. विशेष म्हणजे, चित्रीकरण असो वा नृत्याचा कार्यक्रम आई माझ्याबरोबर येत असे. त्यामुऴ मला कोणत्याही गोष्टीचा ताण येत नव्हता. मात्र, २०१३ मध्ये मी मुंबईत राहायला गेल्यानंतर तिचा ताण थोडासा हलकासा झाला. मात्र, आजही आई माझी पहिल्यासारखीच काळजी घेते. अजूनही ती माझ्या करिअरचा विचार करते. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळेल, याप्रकारचे एक ना अनेक सल्ले देते. अनेकदा माझ्याकडून काही निर्णय चुकले, तर ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहते. मला पुढं जाण्यासाठी बळ देते. त्याचप्रमाण महत्त्वाच्या गोष्टी कायम सांगत असते.

‘झी’ टीव्हीवरील एकातरी मालिकेत काम करावं, असं तिला पहिल्यापासून वाटतं होतं. त्याचदरम्यान ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण, मला हिंदी मालिकेत काम करायचं होतं. मात्र, आईनं हीच मालिका कर, असं सांगितलं. त्यामुळं आईच्या इच्छेखातर मी त्या मालिकेत काम केलं. विशेष म्हणजे, ती मालिका खूप हिट झाली. त्या वेळी आईला खूपच भरून आलं होतं. पुणे विद्यापीठामध्ये पदवीत मी टॉपर आले होते. तसेच, मला भरतनाट्यममध्ये स्कॉलरशिप मिळाली, त्या वेळी आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. खरंतर ज्या वेळी आई आनंदित होते, त्या वेळी मलाही खूप छान वाटतं. कारण, तिफ माझ्याकडून जी काही स्वप्नं पाहिली आहेत, ते खऱ्या अर्थानं पूर्ण होत असल्याचा मलाही अभिमान वाटतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई बेधडक आणि स्ट्राँग आहे. एखादी गोष्टी करायची ठरवली तर ती नक्कीच करते. मग, त्यामध्ये कोणतंही कारण शोधत नाही. तिची विचार करण्याची क्षमता खूपच जबरदस्त आहे. काम करण्याचा तिचा वेग माझ्यापेक्षा दहापटीनं जास्त आहे. ती जेवढी जिद्दी व कष्टाळू आहे, तेवढीच प्रेमळही आहे. खरंतर तिच्याएवढे गुण माझ्यात नसले, तरी तिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी पुढं जात आहे, याचा मला खरोखरच आनंद आहे.
शब्दांकन - अरुण सुर्वे

Section mytrin

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()