स्वयंपाक करताना तळणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. पापड तळण्यापासून चकल्या, भजी, फ्रेंच फ्राइज असे किती तरी पदार्थ वेळोवेळी तळण्याची वेळ येते.
स्वयंपाक करताना तळणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. पापड तळण्यापासून चकल्या, भजी, फ्रेंच फ्राइज असे किती तरी पदार्थ वेळोवेळी तळण्याची वेळ येते. मात्र, पारंपरिक साधनांमध्ये तळण्याची प्रक्रिया थोडी धोकादायक असते. उकळत्या तेलातून झाऱ्याने तो पदार्थ हलवत असताना, कढईतून उचलत असताना चुकून पुन्हा तेलात पडला, तर तेल अंगावर उडण्याची भीती असते. बॉबीसारखे छोटे छोटे पदार्थ तळताना तर आणखी तारांबळ उडते.
यासाठी फिल्टर स्पून अँड क्लिप नावाचं उपकरण अतिशय उपयोगी पडतं. यात नेहमीच्या झाऱ्यापेक्षा मोठा फिल्टर असतो आणि त्याच्यावर तो पदार्थ व्यवस्थित पकडता यावा यासाठी एक क्लिप दिलेली असते. तेलातून तो पदार्थ उचलताना त्यावर क्लिप दाबली, की तो पदार्थ बरोबर उचलता येतो आणि पुन्हा तेलात पडण्याची भीती राहत नाही.
फिल्टर स्पूनची वैशिष्ट्ये
स्टेनलेस स्टीलने बनल्यामुळे तेलाचं तापमान कितीही असलं तरी काही फरक पडत नाही.
पदार्थ सटकण्याची भीती कमी होते.
अनेकदा पदार्थ व्यवस्थित तळण्यासाठी तेलातच उलटाही करावा लागतो. अशा वेळीही हे उपकरण अतिशय उपयोगी पडते.
स्पून आणि क्लिप यांना जोडणारा भाग लवचिक असल्यामुळे पाहिजे तसा दाबता येतो.
स्वच्छ करायला अतिशय सोपे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.