चेहेऱ्यावर सतत येणाऱ्या Pimples मुळे त्रस्त असाल तर 'हे' घरगुती उपाय एकदा तरी ट्राय करा

बाजारामध्ये पिंपल्सच्या समस्येवर विविध प्राॅडक्ट Face Care Products मिळत असले तरी अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याविना हे प्राॅडक्ट वापरणं हानीकारक ठरू शकतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा अधिक डॅमेज होवू शकते
पिंपल्सपासून मुक्तता
पिंपल्सपासून मुक्तताEsakal
Updated on

चेहऱ्यावर एकही पिंपल नसावा तसचं चेहऱ्यावर डाग नसावे आणि चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स Pimples येत असतात. अगदी वाढत्या वयातही पिंपल्स थांबण्याचं काही नाव घेत नाही. Beauty Tips Marathi how to get free from pimples from your face

सतत पिंपल्स किंवा मुरुम Pimples on Face आल्याने चेहऱ्यावर त्याचे डाग दिसू लागतात. यामुळे चेहऱ्याचं सौदर्य कमी होतं. अनेकदा सतत येणाऱ्या पिंपल्समुळे तरुण किंवा तरुणींमध्ये आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसून येतं.

बाजारामध्ये पिंपल्सच्या समस्येवर विविध प्राॅडक्ट Face Care Products मिळत असले तरी अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याविना हे प्राॅडक्ट वापरणं हानीकारक ठरू शकतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा अधिक डॅमेज होवू शकते. तर डॉक्टरांकडे जाऊन ट्रिंटमेंट घेणं हे अनेकांच्या खिशाला परवडणारं नसतं. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकता.

आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय Home Remedies सांगणार आहोत. ज्यामुळे त्वचा डीप क्लिंझ म्हणजेच आतपर्यंत स्वच्छ होईल. जेणेकरून सतत पिंपल्स येण्याची समस्या दूर तर होईलच, शिवाय तुमची त्वचा सॉफ्ट आणि चमकदार दिसू लागेल.

पिंपल्सवर प्रभावी फेस पॅक Homemade face Pack for pimples

पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आणि चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कडुलिंब, पुदीना आणि हळदीचा फेस पॅक तयार करू शकता. या फेस पॅकमुळे तुमच्या त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर होतील.

- हा फेस पॅक तयार करण्यासाठी काही कडुलिंबाची पानं आणि काही पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यात टाका.

- यामध्ये चमचाभर हळद आणि थोडं पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्या.

- ही पेस्ट आईस ट्रेमध्ये टाकून फ्रिजरमध्ये ठेवा.

- कडूलिंब, पुदिना आणि हळदीच्या या आईस क्युब दिवसातून दोनदा पिंपल्स असेल्या भागावर लावा.

हे देखिल वाचा-

पिंपल्सपासून मुक्तता
Pimple Remedy : पिंपल्सपासून सुटका हवी असेल तर कडूलिंबाचं पाणी फायद्याचं, असा करा उपयोग

- संपूर्ण चेहऱ्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता.

- १० मिनिटांनी चेहरा धुवा.

- या फेसपॅकमुळे पिंपल्सची समस्या कमी होईल शिवाय चेहऱ्यावरील डाग फिके होण्यास मदत होईल.

- चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होईल.

- हा फेस पॅक आईस क्यूब स्वरूपात लावल्याने पिंपल्समुळे चेहऱ्यावर येणारी सूज कमी होण्यासही मदत होते.

- तसचं त्वचेची जळजळ कमी होवून शांत वाटतं.

कडूलिंब, पुदिना आणि हळदीच्या फेस पॅकचे फायदे

फेस पॅकमध्ये वापरण्यात आलेल्या कडुलिंबाचा आजवर अनेक आर्युवेदिक औषधांमध्ये वापर करण्यात आला आहे. कडुलिंबामध्ये अँटीएजिंग तसचं अँटीफंगल गुणधर्म असल्याने पिंपल्सची समस्या कमी होते. तसंच कडूलिंबामुळे त्वचेचं यूव्ही किरणांपासून, प्रदूषण आणि धुळीमुळे होणारं नुकसान कमी होण्यास मदत होते. तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी कडूलिंबाचा वापर प्रभावी ठरू शकतो.

पुदीन्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, आयरन आणि अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. ज्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पुदिन्यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. तसंच यामुळे बॅक्टेरियापासून त्वचेचं संरक्षण होवून पिंपल्स दूर होतात.

फेस पॅकमध्ये वापरण्यात आलेल्या हळदीचे तर त्वचेसाठी असंख फायदे आहेत. हळदीतील अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे पिंपल्स आणि मुरुम कमी होतात. तसंच डाग फिके होवून चेहऱा उजळण्यास हळद उपयुक्त ठरते. हळदीमुळे कमी वयातच चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या दूर होते.

अशा प्रकारे घरात तयार करण्यात आलेल्या या फेस पॅकचा नियमितपणे वापर केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स तर दूर होतीलच शिवाय चेहऱ्य़ावर नैसर्गिक ग्लो येईल.

हे देखिल वाचा-

पिंपल्सपासून मुक्तता
Pimples Causes : झोपण्याच्या या सवयींमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()