आरोग्यमंत्र : हृदयाचे ‘अरिदमिया’

आपण हृदयविकार असे म्हणतो, तेव्हा आपल्यासमोर हार्ट अटॅक हेच येते. हार्ट ॲटॅक हा हृदयाच्या रक्तपुरवठ्याचा रोग आहे. ‘अरिदमिया’ हे हृदयाची गती आणि लय याविषयीचे आजार आहेत.
heart arrhythmia sickness
heart arrhythmia sicknesssakal
Updated on
Summary

आपण हृदयविकार असे म्हणतो, तेव्हा आपल्यासमोर हार्ट अटॅक हेच येते. हार्ट ॲटॅक हा हृदयाच्या रक्तपुरवठ्याचा रोग आहे. ‘अरिदमिया’ हे हृदयाची गती आणि लय याविषयीचे आजार आहेत.

आपण हृदयविकार असे म्हणतो, तेव्हा आपल्यासमोर हार्ट अटॅक हेच येते. हार्ट ॲटॅक हा हृदयाच्या रक्तपुरवठ्याचा रोग आहे. ‘अरिदमिया’ हे हृदयाची गती आणि लय याविषयीचे आजार आहेत.

आपण नेहमी जेव्हा हृदयविकार असे म्हणतो, तेव्हा आपल्यासमोर हार्ट अटॅक हेच येते. हार्ट ॲटॅक हा हृदयाच्या रक्तपुरवठ्याचा रोग आहे. अरिदमिया हे हृदयाच्या गती आणि लय याविषयीचे आजार आहेत. जसे घराला प्लम्बिंग आणि विद्युत असे दोन भाग असतात; तसेच हृदयाला विद्युत म्हणजे हृदयाचे ठोके पडण्याची गती आणि लय आणि रक्तपुरवठा म्हणजे प्लम्बिंग आहे. या विद्युतपुरवठ्यामध्ये आणि वायरिंगमध्ये दोष निर्माण झाल्यास अरिदमिया निर्माण होतात.

अरिदमियाचे प्रकार

हृदयाच्या अरिदमियाचे दोन प्रकार असतात

1) ब्रॅडीरिदमिया : यामध्ये हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होते. निरोगी हृदयाची नाडीची गती ही ७२ ठोके प्रति मिनिट ते १०० प्रति मिनिट असते. जेव्हा हे ठोके ७२ पेक्षा कमी गतीने पडतात, तेव्हा त्याला ब्रॅडीकार्डिया असे म्हणतात.

2) टाकीकार्डिया : जेव्हा हृदयाचे ठोके १२० पेक्षा जास्त गतीने पडतात, तेव्हा त्याला टाकियारिदमिया असे म्हणतात.

अरिदमियाची लक्षणे

हृदयाची धडधड वाढणे आणि ती अयोग्यरीत्या जाणवणे, याला ‘पालपीटेशन’ असे म्हणतात. ही जर खूप वेळ जाणवली, तर ते अरिदमियाचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर डोळ्यापुढे अंधारी येणे, चक्कर येऊन पडणे यासारखे प्रकार होऊ शकतात.

हृदयाची गती खूप वाढणे अथवा खूप कमी होणे, या दोन्हीमध्ये डोळ्यापुढे अंधारी येऊन चक्कर येऊ शकते. कधी कधी याचे पर्यवसान हृदय थांबणे म्हणजे कार्डियाक अरेस्टमधेही होऊ शकते. काही वेळेस अत्यंत जास्त गतीने ठोके पडल्यास मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन फिट्स किंवा सिझर येऊ शकतात. काही अनियमित अरिदमियामध्ये रक्ताची गुठळी होऊन पॅरालिसिस स्ट्रोक होऊ शकतो. काही स्वरूपाचे अरिदमिया हे अनुवांशिकही असू शकतात.

पुढील भागामध्ये आपण अरिदमिया यांचे निदान कसे करावे व त्याच्यावर काही उपाय कसे करावेत ते पाहूयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()