Glowing skin- बिना मेकअप चेहऱ्यावर हवाय ग्लो, मग या Beauty Tip तुमच्यासाठी

how to look beautiful without makeup naturally: चेहऱ्यावरील ग्लोसाठी Face Care बाजारात अनेक प्राॅडक्ट्स उपलब्ध आहेत. यात केमिकल्स तर असतातच शिवाय अनेकदा त्या प्रचंड महागही असतात.
how to look beautiful without makeup naturally
how to look beautiful without makeup naturallyEsakal
Updated on

Makeup Tips: चेहेऱ्यावर कोणतेही डाग किंवा सुरकुत्या नसाव्या आणि चेहरा कायमच फ्रेश आणि चमकदार दिसावा असं प्रत्येकीलाच वाटतं. चेहरा चमकदार दिसण्यासाठी अनेकजणी वेगवेगळ्या क्रिम किंवा सिरमचा वापर करतात.

मात्र अनेकदा या क्रिममधील Cream केमिकल्समुळे चेहरा तात्पुरता उजळतो किंवा डाग नाहीसे होत असले तरी काही काळाने त्याचे त्वचेवर विपरीत परिणाम दिसू लागतात. Glowing skin home remedies Marathi Beauty Tips

रोजचं प्रदूषण आणि धुळीमुळे चेहऱ्याची Face काळजी घेणं गरजेचं तर आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग तसचं टॅनिंग आणि सुरकुत्यांच्या समस्यांपासून तुम्ही चिंताग्रस्त असला तर आम्ही तुम्हाला काही अशा ब्युटी टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येईल.

चेहऱ्यावरील ग्लोसाठी Face Care बाजारात अनेक प्राॅडक्ट्स उपलब्ध आहेत. यात केमिकल्स तर असतातच शिवाय अनेकदा त्या प्रचंड महागही असतात. अशावेळी हे प्राॅडक्ट नियमितपणे वापरणं खिशाला परवडत नाही. म्हणूनच घरात अगदी सहज उपलब्ध होणारे किंवा अगदी खिशाला परवडतील अशा वस्तूंचा वापर करून चेहऱ्यावर ग्लो आणणं सोप आहे. 

हे देखिल वाचा-

how to look beautiful without makeup naturally
Face Care : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी घरीच तयार करा द्राक्षाचे हे ५ फेसपॅक

बटाटा- बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट Dark Spots आणि टॅनिंग दूर करणं शक्य आहे. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तरी बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होईल. कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे करावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला कच्च दूध लावावं. यामुले त्वचेवरील डाग फिके होण्यास मदत होईल. 

नारळ पाणी- नारळ पाण्यामुले त्वचेवरील डाग फिके होण्यासाठी मदत होते. यासाठी नारळ पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळा. त्यानंतर हे नारळपाणी आइस ट्रेमध्ये टाकून त्याचा बर्फ होवू द्या.

नारळ पाण्याच्या या आइस क्यूबने रोज चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. नारळ पाण्यात असलेल्या कॅराटीनमुळे त्वचेवरील डेडस्किन निघण्यास मदत होते आणि नवी त्वचा विकसित होते. 

हळद आणि मलई- चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासोबतच चेहऱ्यावरील डाग फिके करण्यासाठी हळद आणि मलईचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. यासाठी एक चमचा दूधाच्या मलईमध्ये चिमूटभर हळद पावरड तसचं गुलाब पाण्याचे काही थेंब टाकावे.

त्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी.  त्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर राहू द्यावी. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. या पेस्टचा नियमित वापर केल्यास आठवडाभरातच तुम्हाला फरक जाणवू लागेल. चांगला रिझल्टसाठी २ महिने याचा नियमित वापर करावा. 

टोमॅटो- टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. यासाठी टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा. त्यानंतर १० मिनिट टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या.

त्यानंतर चेहरा स्वच्छ धूवून सुती कापडाने कोरडा करावा आणि माइश्चराइजर लावाव . यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. तसचं जर तुम्ही डोळ्यांभोवती आलेल्या डार्क सर्कल्समुळे हैराण झाला असाल तर त्या दूर करण्यासाठी टोमॅटो चांगला पर्याय आहे.

टोमॅटो फेस पॅक लावून किंवा टोमॅटोच्या स्लाइस डोळ्यांवर ठेवल्यास डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. शिवाय डोळ्यांना आरामही मिळतो. Tomato for dark circle

नारळ आणि कापूर- अनेकदा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. यासाठी नारळाच्या तेलात कापूरच्या एका गोळीची पावडर करून चांगली एकजीव करून घ्यावी. ह पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे मुरुमाची समस्या कमी होण्यास मदत होईल. Homemade face pack for glowing skin

फळांचा फेस मास्क- अनेक फळांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी अर्ध केळ, एक पपईचा तुकडा चांगला कुस्करून त्याच एक चमचा मध टाकावा.

हा मास्क चेहऱ्याला रोज २० मिनिटं लावावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होवून चेहऱ्यावर चांगली चमक येते. महागड्या क्रिमपेक्षा फ्रूट फेस मास्क हा अधिक उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते. Fruit face pack for glowing skin 

बेसन आणि हळद पावडर- नैसर्गिक रित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसण आणि हळद अत्यंत उपयुक्त आहेत. यासाठी बेसनामध्ये चिमुटभर हळद मिसळून पेस्ट तयार करावी. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवावा.

त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. तुमची त्वचा कोरडी असेल तर दुधामध्ये हा पॅक तयार करा. या फेसपॅकमुळे काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. तसचं टॅनिंग कमी करण्यासाठी हा एक उपयुक्त उपाय आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()