माय फॅशन : ‘प्रसंगांनुसार पेहराव निवडा’

फॅशन व्‍यक्‍तीच्‍या स्‍टाइलला व्‍यक्‍त करते. फॅशन करताना कम्फर्टेबल वाटण्‍यासोबत सर्वांत महत्त्वाचा पैलू म्‍हणजे भारतीय पोशाख असो किंवा पाश्चिमात्य, तुमचे व्‍यक्तिमत्त्व दिसून येईल, अशा पोशाखाची निवड करावी.
Neha Joshi
Neha JoshiSakal
Updated on
Summary

फॅशन व्‍यक्‍तीच्‍या स्‍टाइलला व्‍यक्‍त करते. फॅशन करताना कम्फर्टेबल वाटण्‍यासोबत सर्वांत महत्त्वाचा पैलू म्‍हणजे भारतीय पोशाख असो किंवा पाश्चिमात्य, तुमचे व्‍यक्तिमत्त्व दिसून येईल, अशा पोशाखाची निवड करावी.

- नेहा जोशी

मला साड्या खूप आवडतात, त्‍या सर्व प्रसंगांसाठी अनुकूल आहेत आणि अत्‍यंत मोहक दिसतात. साड्या स्‍टाइलला शोभून दिसतात आणि दीर्घकाळापासून नेसल्‍या जात आहेत. पेस्‍टल शिफॉन्‍स असो किंवा ब्रीझी कॉटन साडी असो, प्रत्‍येक प्रसंगासाठी निवडण्‍याकरिता अनेक साड्या आहेत. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि मला कॉटन साडी खूप आवडते. नुकतीच मी माझी मालिका ‘दुसरी माँ’च्‍या लाँचसाठी लखनौला गेले होते. माझ्या व्यग्र प्रमोशन्‍समधून वेळ मिळाल्‍यानंतर मी प्रथम स्‍वत:साठी चिकनकरी साडी खरेदी केली. माझ्या वॉर्डरोबमध्‍ये या साडीची भर करण्‍याची मी दीर्घकाळापासून वाट पाहत होते.

फॅशन व्‍यक्‍तीच्‍या स्‍टाइलला व्‍यक्‍त करते. फॅशन करताना कम्फर्टेबल वाटण्‍यासोबत सर्वांत महत्त्वाचा पैलू म्‍हणजे भारतीय पोशाख असो किंवा पाश्चिमात्य, तुमचे व्‍यक्तिमत्त्व दिसून येईल, अशा पोशाखाची निवड करावी. सामान्‍य चूक म्‍हणजे तुम्‍हाला कम्फर्टेबल न वाटणारे किंवा तुमचे व्यक्तिमत्त्व किंवा स्‍टाइलला व्‍यक्‍त न करणारे पोशाख खरेदी करणे आणि त्‍या ट्रेण्‍डला फॉलो करणे. माझ्या मते पोशाख किंवा डिझाइननुसार योग्‍य मेक-अप करावा, तसेच आभूषणांची निवड करावी. तसेच प्रसंगानुसार योग्‍य पेहराव करा. तुम्‍ही कुठे जात आहात किंवा उपस्थित असणार आहात ही बाब लक्षात ठेवा आणि त्‍यानुसार तुमचे पोशाख असण्‍याची काळजी घ्‍या.

प्रसंगानुसार पोशाख हा माझ्या फॅशनचा मुख्‍य नियम आहे. स्‍टायलिंगसह आभूषणे- जसे नाकातील नथनी तुमच्‍या संपूर्ण लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करू शकते. मला चांदीचे व अँटिक दागिने खूप आवडतात. माझ्या मते परंपरागत पोशाख परिधान करताना अधिक प्रमाणात मेक-अप करणे टाळावे.

मी सर्व प्रकारच्‍या रंगांचे पोशाख परिधान करत असले, तरी मला विटकरी रंग खूप आवडतो. कारण मला वाटते की, हा रंग माझे स्किन टोन व व्‍यक्तिमत्त्वाला शोभून दिसतो. विटकरी रंग उत्‍साहपूर्ण असतात आणि इतर रंग व प्रिंट्ससोबत शोभून दिसू शकतात. म्‍हणून माझा सल्‍ला आहे की, रंग निवडताना स्कीन टोनला शोभून दिसतील अशा रंगांची निवड करावी.

माझ्या फॅशन आयकॉन आहेत स्मिता पाटील. त्‍या सर्व पोशाखांमध्‍ये, खासकरून साड्यांमध्‍ये इतक्‍या मोहक दिसतात की माझी त्‍यांच्‍यावरून नजरच हटत नाही. त्‍या परिधान करणाऱ्या प्रत्‍येक पोशाखामध्‍ये सुंदर दिसतात, सफेद रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्‍स व क्‍लासी आभूषणांमध्‍ये त्‍या खूप मोहक दिसतात. त्‍यांचे संपूर्ण व्‍यक्तिमत्त्व चमकदार आहे.

फॅशन टिप्‍स

  • प्रसंग, तुमचे व्‍यक्तिमत्त्व आणि स्किन टोनला साजेशा रंगांचे पोशाख परिधान करा.

  • तुमचा लुक साधा ठेवा, त्‍यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.

  • तुमच्‍या देहबोलीनुसार आणि तुम्‍हाला आतून आनंदी वाटेल अशा डिझाइन पॅटर्न्‍सची निवड करा.

  • प्रसंगानुसार मेकअप करा; पण त्‍याचा अतिरेक न करता साधा व नैसर्गिक ठेवा.

  • ट्रेण्‍डला फॉलो करणे महत्त्वाचे नाही; तुमच्‍या व्‍यक्तिमत्त्‍वाला साजेसे आणि तुम्‍हाला आत्‍मवि‍श्‍वास वाटेल असे पोशाख परिधान करा.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()