माय फॅशन : ‘काँट्रास्टचाही विचार करा’

पहिल्यापासूनच मला साडी नेसायला आवडते. मात्र, मला एकाच पद्धतीच्या साड्या नाही आवडत. सॉफ्ट मल कॉटन, शिफॉन, जॉर्जेट अशा साड्या आवडतात.
Rupali Bhosale
Rupali BhosaleSakal
Updated on
Summary

पहिल्यापासूनच मला साडी नेसायला आवडते. मात्र, मला एकाच पद्धतीच्या साड्या नाही आवडत. सॉफ्ट मल कॉटन, शिफॉन, जॉर्जेट अशा साड्या आवडतात.

पहिल्यापासूनच मला साडी नेसायला आवडते. मात्र, मला एकाच पद्धतीच्या साड्या नाही आवडत. सॉफ्ट मल कॉटन, शिफॉन, जॉर्जेट अशा साड्या आवडतात. वजनाने हलक्या साड्या नेसायला मी प्राधान्य देते. फॅशन करताना, ड्रेस घालताना, साडी नेसताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. मला वाटतं, साडी किंवा ड्रेस जर भरजरी असेल, तर फार दागिने घालू नयेत. मी व्यक्तिश: या गोष्टी पाळते. याउलट सिंपल प्लेन साडी असेल, तर तुम्ही ठसठशीत दागिने घालू शकता. मॅचिंग साडीवर मॅचिंग ब्लाउज आणि मॅचिंग दागिने घालण्यापेक्षा विरुद्ध रंगसंगतीचा वापर करा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे साडी फार वर नेसू नये. पदरावरती नक्षीकाम असेल, तर साडीचा पदर मोकळा सोडलेला चांगला दिसतो. या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या, तर तुम्ही नक्कीच ग्रेसफुल दिसाल. 

मला वाटतं, जे कपडे न घाबरता आत्मविश्वासाने तुम्ही कॅरी करू शकता असेच कपडे घाला. मला ज्यात कम्फर्टेबल वाटतं, असेच कपडे घालते. मात्र, मला कपड्यांच्या बाबतीत प्रयोग करायला आवडतं, हाच माझा फॅशन फंडा आहे. मला कॉन्ट्रास्ट करायला खूप आवडतं. म्हणजे साडीच्या रंगाचा ब्लाउज मला घालायला आवडत नाही. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना हे पात्र साकारताना मी या गोष्टींचा आवर्जून विचार करते. साडीवर विरुद्ध रंगाचं ब्लाउज जास्त ग्रेसफुल दिसतो. त्यामुळे संजना खूप स्टायलिश दिसते. त्यामुळेच संजनाची स्टाइल स्टेटमेंट खूपच लोकप्रिय झाली आहे.

कपड्यांच्या रंगांची निवड करताना तुमच्या स्कीनटोनपेक्षा ब्राइट रंग निवडावा. जर तुम्ही गव्हाळ वर्णी असाल, तर ब्राइट शेड चांगली दिसते. डार्क रंग चांगले दिसत नाहीत. मात्र, तुम्ही गोरे असाल तर तुम्हाला पेस्टल शेड्स चांगले दिसतील. तुमच्या रंगाच्या एक टोन गडद रंगाच्या कपड्यांची निवड करावी. मला दीपिका पदुकोण, आलिया भट्ट यांचा स्टाइल सेन्स आवडतो. मला रेखा यांच्या साड्यांचीही क्रेझ आहे. तसं पाहिलं तर फॅशन आयकॉन कुणी एक सांगता येणार नाही. कारण फॅशन ही सतत बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे स्टाइल आयकॉन्सही बदलतात. मी हॉलिवूड, बॉलिवूडमध्ये होणाऱ्या ॲवॉर्ड फंक्शनचे रेड कार्पेट सोहळेही पाहते. त्यामुळे फॅशन ट्रेंड कळतात.

फॅशन टिप्स...

  • स्वत:वर विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला ओळख देतो.

  • कपड्यांची रंगसंगती विचारपूर्वक निवडा.

  • भरजरी कपड्यांवर कमी दागिने आणि साध्या कपड्यांवर हेवी ज्वेलरी उठून दिसते.

  • कपडे आणि दागिन्यांच्या बाबतीत प्रयोगशील राहा.

  • कम्फर्टेबल असणाऱ्या कपड्यांची निवड करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.