पुणे, ता. १२ - सकाळच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पुणे शहरातील महाविद्यालयांमध्ये नुकतेच मतदान पार पडले. प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्याने यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला व आपापल्या महाविद्यालयातील यिन प्रतिनिधींवर शिक्कामोर्तब केले. यानिमित्ताने बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याचा अनुभव बहुतांश विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मिळाला. या प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कुतूहल होते.
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क तर्फे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी यिन निवडणूक प्रक्रियेला पुण्यात मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण असलेली हि निवडणूक यंदा ऑफलाईन पार पद्धतीने पार पडत आहे. पुढे ती दोन टप्यात होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पुण्यातील महाविद्यालयात प्रचंड उत्साह दिसून येत होता. केंद्राबाहेर मतदार चिट्ठी (वोटर स्लिप) देण्याची व्यवस्था ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तरुणाईनेच सांभाळली. सकाळपासूनच घोळक्याने विद्यार्थी मतदार मतदान केंद्रावर पोहोचत होते. अनेक ठिकाणी आपला मित्र उमदेवार रिंगणात असल्याने समर्थक आवर्जून उपस्थित होते. सकाळच्या पहिल्या टप्प्यात तरुणांनी स्वतःचे मतदान करून दुपारपर्यंत इतर मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केल्याचे चित्र पुण्यातील अनेक महाविद्यालयात दिसत होते. महाविद्यालयामध्ये आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विद्यार्थी मतदान करताना दिसून आले.
मतदानापूर्वी उमेदवार स्वतःची ओळख करून देत निवडणूक लढविण्यामागची भूमिका सांगत होते. मतदान करण्याचा उत्साह विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर होता. सर्वजण गटागटाने येत रांगेत उभे राहून मतदान करत होते. त्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग रांगेची शिस्त लावण्यासोबतच मतदान करण्यासाठी साऱ्यांना प्रोत्साहित केले. लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानातून निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर उमेदवारांसमक्ष प्राचार्यांच्या स्वाक्षरीने मतपेटी सील केली. प्रक्रियेतील या पारदर्शकतेचे विद्यार्थी, प्राध्यापकांनी स्वागत केली. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावला. केवळ यिन मुळे बॅलेट पेपरवर मतदान करण्याची संधी पहिल्यांदा मिळाल्याचा अनुभव या वेळेस साऱ्यांनी सांगितलं प्रत्येक महाविद्यालयातून प्राचार्यांच्या सहमतीने निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तसेच कोअर टीमचे दोन सदस्य , 'सकाळ'चा एक कर्मचारी यांनी या निवडणूक प्रक्रियेची देखरेख केली.
भारताच्या राजकारणात तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयातील तरुणाईसाठी यिनने 'नेतृत्व विकास कार्यक्रम' च्या माध्यमातून अत्यंत उपयोगी आणि प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेऊन राजकारणात येण्यासाठी तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने देखील या उपक्रमात सहभागी होऊन तरुणांचा उत्साह वाढविणारं आहोत. यिन च्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
डॉ. अनुराग कश्यप, प्राचार्य, कमिन्स कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी व त्यांचा व्यक्तिमत्व विकास साध्य होण्यासाठी यिन चा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या माध्यमातून राज्यस्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. यामधून भविष्यतील युवक केंद्रित राजकारणाचा एक आश्वासक पाय घातला जात असून सामान्य कुटुंबातील राजकीय महत्त्वाकांक्षा आणि क्षमता असणाऱ्या मुलांना / मुलींना राजकीय व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
सचिन सानप, विश्वस्त, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी
भारत हा तरुणाईचा देश समजला जातो. भारताचे भविष्य हे येणाऱ्या पिढीच्या तसेच तरुणाईच्या हातात आहे. यासाठी संघटन कौशल्य, नेतृत्वगुण, सर्वसमावेशक नेता निर्माण होण्याची गरज आहे. यिन च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून नक्कीच देशाला दिशा देणारे नेतृत्व उदयास येईल याची खात्री आहे. या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा.
राहुल भिमराव बळवंत , प्राचार्य , अभिनव कला महाविद्यालय.
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व नेतृत्वक्षम करण्यासाठी सकाळचे यिन हे एक महत्वाचे आणि उत्तम व्यासपीठ आहे. यिन निवडणूक प्रक्रियेतील अनेक भाग या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजणार आहेत. तसेच यामुळे विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. आम्ही देखील या उपक्रमाचा भाग होणार आहोत याचा आम्हाला अभिमान आहे .
डॉ. संगीता भिडे, प्राचार्या, महाराष्ट्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय.
भारताच्या राजकारणात तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी होणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयातील तरुणाईसाठी यिनने 'नेतृत्व विकास कार्यक्रम' च्या माध्यमातून अत्यंत उपयोगी आणि प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेऊन राजकारणात येण्यासाठी तरुणाईला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या महाविद्यालयाच्या वतीने देखील या उपक्रमात सहभागी होऊन तरुणांचा उत्साह वाढविणारं आहोत. यिन च्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. डॉ. अनुराग कश्यप, प्राचार्य, कमिन्स कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.