रसायनशास्त्र : एक अजब रसायन

हॉस्पिटलमध्ये दिली जाणारी औषधे ही रसायनाची असतात. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. घराला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते.
रसायनशास्त्र: एक अजब रसायन
रसायनशास्त्र: एक अजब रसायनsakal
Updated on

रसायनशास्त्र अर्थात केमिस्ट्री हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो. रसायनशास्त्राला केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. उदाहरणार्थ वनस्पती रसायनशास्त्र (वनस्पतीशास्त्र), अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे कमी होतात (पर्यावरणशास्त्र), औषधे कशी कार्य करतात (मेडिसिनल केमिस्टरी), औषधे कशी निर्माण करतात (औषधनिर्माण शास्त्र), गुन्हेगारांचा डीएनए, इतर पुरावे कसे गोळा करावेत(फॉरेनसिक केमिस्टरी), आणि खाण्याचे पदार्थ (फूड केमिस्टरी) ... रसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे.

हॉस्पिटलमध्ये दिली जाणारी औषधे ही रसायनाची असतात. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. घराला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते.

आता हेच पहा आपण श्वास घेताना ऑक्सिजन आत घेतो आणि श्वास सोडताना कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतो हे रासायनिक घटक आहेत. रसायनशास्त्राची खरी मज्जा कुठे आहे. पाहा माणूस हे एक अजब ‘रसायन’ आहे, हा वाक्यप्रचार आपण खूप वेळा अनेक अर्थाने वापरतो. कधी अनेक गुण अंगी असणाऱ्या एखाद्या माणसाबद्दल तर कधी विचित्र वागणूक असणाऱ्या एखाद्या महाभागाबद्दल! कधी एखाद्या विषयात अतिशय कौशल्य प्राप्त केलेल्या कलाकाराबद्दल तर कधी काहीही न करतादेखील आपली दिनचर्या सुखात घालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल!! पण हे झाले सगळे स्वभाव किंवा गुणविशेष, आपण तर वाचतो आहोत ‘विज्ञानाचं’ सदर! तेव्हा, ‘माणूस हे एक अजब रसायन आहे’, हे विधान विज्ञानाच्या कसोटीवर उतरायला हवं, तपासायला हवं, नाही का?

रसायनशास्त्र: एक अजब रसायन
YIN मंत्री करणार 'या' मागण्यांचा पाठपुरावा...

माणसाच्या शरीराचा जवळजवळ ९९ टक्के भाग हा ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस या सहा मूलद्रव्यांच्या संयुगांपासून तयार झालेला आहे. आणि उरलेल्या भागात पोटॅशियम, सल्फर, सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, आयर्न, फ्लुओरिन, झिंक, कॉपर (तांबे), आयोडीन, सेलेनियम, क्रोमियम, मँगेनीज, कोबाल्ट, मॉलिब्डेनम ही आणि अशी अनेक सूक्ष्म प्रमाणात असलेली मूलद्रव्यांची संयुगं आहेत. खरं पाहिलं तर माणसाचं शरीरच नव्हे पण या विश्वातली कुठलीही गोष्ट ही कुठल्या-न-कुठल्या मूलद्रव्यांच्या रसायनांनीच तयार झालेली आहे. म्हणून ज्ञात सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, एक अजब रसायनच आहे.

‘रसायन’ हे अनेक गोष्टी एकत्र येऊन तयार झालेलं असतं. कुठलंही रसायन तयार होताना जे ‘मूलभूत पदार्थ’ एकत्र येतात त्यांना ‘मूलद्रव्य’ असं म्हणतात. इंग्रजीत याला एलेमेंट्स म्हणतात. त्यामुळे असं म्हणता येईल किमान आजवर ज्ञात झालेली ११८ किमयागार ‘मूलद्रव्य’च अजब सृष्टीच्या अस्तित्वाला कारणीभूत आहेत. या प्रत्येक मुलद्रव्याच्या ‘असण्या’ची जाणीव माणसाला कधी आणि कशी झाली? त्यांचे स्वभावविशेष कसे असतात? त्यांचे स्वभाव कळल्यावर माणसाने आपल्या ‘किमयेने’ त्यांचा उपयोग कसा करून घेतला? आता माणसाचा स्वभाव म्हटलं कि, त्याचे अनेक प्रकार असतात जसे रसायनशाश्त्रातल्या एलेमेंट्सचे असतात म्हणून आपण माणसाचा स्वभाव आणि पिरियॉडिक टेबल मधल्या एलेमेंट्सची तुलना करू शकतो.

रसायनशास्त्र: एक अजब रसायन
अँथनी ब्लिंकेन यांच्या भेटीचे फलित

पिरियॉडिक टेबलमध्ये जे (धातू)अल्कली मेटल्स आहेत ते खूप रिऍक्टिव्ह असतात, ट्रान्सिशन मेटल्स बहुरूपी असतात तर नॉन मेटल्स हे मध्यम रिऍक्टिव्ह असतात, मेटाललॉइड्स म्हणजे कधी मेटल तर कधी नॉन मेटल म्हणजे संतुलित असतात आणि इनर्ट गॅसेस हे कशातच भाग घेत नाहीत. अजून एक प्रकार असतो तो म्हणजे रेडिओअॅक्टिव्ह एलेमेंट्सचा की ज्याचे अणू अस्थिर असतात ज्यामुळे ते खूपच रिअॅक्टिव्ह असतात आणि ज्यामूळे खूप जास्त हानी होऊ शकते. एक रसायनशास्त्रज्ञ सर्व एलेमेंट्स चे गुण समजून घेऊन त्यांचा वापर प्रयोगशाळेत करत असतो.

मनुष्याच्या स्वभावाचे पण असेच काहीसे प्रकार असतात. जसे की काही लोक तापट असतात म्हणजेच अगदी रेडिओअॅक्टिव्ह एलेमेंट्स सारखे ज्या मुळे कधी कुठला स्फोट होईल सांगता येत नाही ,काही जरा जास्तीच प्रतिक्रियाशील असतात अल्कली मेटल्स सारखी, काही माध्यम प्रतिकिया देतात नॉन मेटल्स सारखी, काही लोकांचे बहुरूपी चेहेरे असतात ट्रान्सिशन मेटल्ससारखे आणि हो काही जणांचे स्वभाव अगदी संतुलित असतात मेटाललॉइड्स सारखे समोरच्याला समजून घेणारे आणि काही एकदम आलिप्त इनर्ट गॅसेस सारखे. जसा एक रसायनशास्त्रज्ञ सर्व एलेमेंट्सचे गुण समजून प्रयोगशाळेत काम करतो तसं आपण विविध माणसांचे स्वभाव समजून घेऊन वागायचा प्रयत्न केला तर? आहे की नाही साम्य रसायनशास्त्र आणि मनुष्य स्वभावात !!

ह्या एलेमेंट्सला कुठल्याही भावना नाहीत तरी किती समजुतीने सगळ्यांशी संबंध ठेऊन असतात, एखाद्याशी पटलं कि घट्ट संबंध प्रस्थापित करतात त्याला आपण covalent bond असं म्हणतो थोडाफार जमलं तर तेवढ्यापुरतं नातं असता ज्याला पाय बॉन्ड म्हणतो म्हणजे काम झालं कि टाटा बाय बाय,काही ठिकाणी वन वे ट्रॅफिक पण असत बरं का!

आपल्या हवं म्हणून संबंध जोडायचे आणि सगळं काही आपणच करायचं याला कोऑर्डिनट बॉन्ड असा म्हणतात आणि म्हणून आपण असा म्हणतो, Chemistry between two people is good or bad!

शेवटी निष्कर्ष इतकाच ज्याला मनुष्य स्वभाव कळले त्याला रसायनशास्त्र कळले किंवा ज्याला रसायनशास्त्र कळले त्याला मनुष्य स्वभाव कळला !!!!

“Chemistry is a mystery of Chemicals, Chemists are detectives who solve this mystery”

प्रा. गायत्री बुलाख- श्रोत्रीय, सहायक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग ,

मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.