Pune News: स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेत अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयास प्रथम क्रमांक.

पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२२ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
Pune News
Pune News
Updated on

पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२२ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च, पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अनुज कुलकर्णी, वरुण कुलकर्णी व माजी विद्यार्थी निशांत पुजारी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला.

घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन, सांडपाणी नियोजन अशा सामाजिक प्रश्नांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील स्वच्छता, व्यवस्थापनामध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

लोकसहभाग, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पारदर्शकता हे चार मुद्दे केंद्रस्थानी ठेवून प्रकल्पांची मांडणी तयार करावयाची होती. या स्पर्धेमध्ये “सुक्या कचऱ्यापासून पर्यावरण पूरक इंधन” या संकल्पनेवर सदर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

सादर केलेल्या प्रकल्पामुळे वायुप्रदूषण, हॉटेल्स, ढाबा व खानावळीना कमी खर्चामध्ये नवीन उर्जा स्त्रोत उपलब्ध होईल. तसेच माणसाच्या अंत्यविधी क्रियेत मोठ्याप्रमाणात लाकडांचा वापर केला जातो.

या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे अंत्यविधी क्रियेत वापर होणाऱ्या वृक्षतोडीस आळा बसेल व पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मोठी मदत होईल असे मत स्पर्धकांनी नोंदविले.

या पुरस्काराचे वितरण मा. चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे हस्ते व मा.आशा राऊत, उपायुक्त घनकचरा विभाग पुणे मनपा, अपूर्वा पालकर कुलगुरू महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या उपस्थित करण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी कचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरणाचे महत्व व त्यासाठी येणारा अफाट खर्च या सर्व बाबींचा परामर्श घेऊन सदर “सुक्या कचऱ्यापासून पर्यावरण पूरक इंधन” हा प्रकल्प लोकोपयोगी असल्याचे सांगितले.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आंतर विद्याशाखीय प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्ष (आयक्यूएसी) मार्फत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रमुख प्रा.गणेश कोंढाळकर यांचे मार्फत प्रोत्साहन दिले जाते.

सदर विद्यार्थ्यांना या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी सिव्हील एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरींग विभागातील प्रा.सागर गावंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मानचिन्ह, पंचवीस हजार रोख रक्कमेचा धनादेश व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा. सौ. प्रमिला गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, मेकॅनिकल इंजिनिअरींग चे विभाग प्रमुख प्रा.गणेश कोंढाळकर, सर्व विभाग प्रमुख, व प्राध्यापकांनी विजेत्यांचे व मार्गदर्शक प्रा.सागर गावंडे यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.