व्हीआयआयटी महाविद्यालयात रक्तदानातून जपली माणुसकी.

रक्तदान करताना विद्यार्थी
रक्तदान करताना विद्यार्थी
Updated on

पुणे ५ : "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान " असे म्हटले जाते. रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. ऐन उन्हाळ्यामध्ये रक्ताचा साठा कमी असतो. तोच तुटवडा भरून काढण्यासाठी व्हीआयआयटी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली. या शिबिराचे उद्घाटन आर.जे. संग्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून ‘यिन’चे व्यवस्थापक शामसुंदर माडेवार, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विवेक देशपांडे उपस्थित होते. यावेळी डीन ऍड डॉ. वैशाली पाटील, डीन स्टुडंट्स अफे. डॉ. राधिका पुरंदरे, असो. डीन स्टुडंट्स अफे. नितीन साखरे, एनएसएस क्लबचे कार्यक्रम अधिकारी विकास कोळेकर, शारदा देसाई व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. या शिबिरात विक्रमी असे तीनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँक व आधार रक्तपेढी, दात्री इकॉसिस्टीम या सामाजिक संस्थेची मोलाची साथ लाभली. शिबिराला विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" या विषयावर जनजागृती झाली. सामाजिक कार्यकर्ते विक्रांत सिंग व लव केअर शेअर फाउंडेशनचे अध्यक्ष पियुष शहा यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना व रक्तदात्यांना सामाजिक कार्याबद्दल प्रोत्साहित केले. एनएसएसव्ही आयआयटीच्या स्वयंसेवकांनी उत्साहाने काम करून हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.