आयुष्यात मैत्री जपा ...

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा यिनच्या मंत्र्यांना सल्ला
उद्योग मंत्री उदय सामंत यिनच्या अधिवेशनात बोलताना.
उद्योग मंत्री उदय सामंत यिनच्या अधिवेशनात बोलताना.
Updated on

मुंबई, ता. ६ : ‘सकाळ’ माध्यम समूह हा जो उपक्रम राबवीत आहे, त्याप्रकारे संधी आम्हाला उपलब्ध झाली नाही. अशी संधी मिळाली असती, तर आज मोठा झालो असतो. या उपक्रमामुळे सुसंस्कृत पिढी घडविली जाणार यात तीळमात्र शंकाच नाही. या शब्दात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ‘यिन’च्या उपक्रमाचे कौतुक केले. सध्या राजकारणात वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका-टिप्पणी करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. राजकारणातील दोन मोठ्या व्यक्ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे एकमेकावर टीका करायचे, मात्र ते चांगले मित्रही होते. त्याचे हे गुण आत्मसात केले पाहिजे, असेही उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मी कोणतीही ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत निवडणूक लढविली नाही. थेट आमदार म्हणून निवडून आलो, राजकारणात विरोधक असायला हवेत, दुसऱ्याचे ऐकणे हा राजकारणाचा मोठा भाग आहे. राजकारण किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही मोठे व्हा; मात्र पाय कायम जमिनीवर ठेवा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. प्रत्येक विद्यार्थी व तरुणांमध्ये हुशारी, कौशल्य असले पाहिजे. हजारो लोकांचा संच तुमच्या जवळ असला पाहिजे. आपण विकलो गेलो, तर लोक आपल्या जवळ नसतील. याचे कायम भान ठेवा, असा मैत्रीवजा सल्ला उद्योगमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ... ‘तुम्ही आमचे राजदूत बना’ राज्यात काही कंपनी बंद होत आहेत, सातारा आयटी हब कधी बनेल? रायगड लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल कॉलेजचे कामकाज योग्य नसल्याची थेट तक्रार विद्यार्थ्यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली. तक्रारीची दखल घेत त्यांनी यावर लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ ही योजना हजारो तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत करणारी आहे. ही योजना तरुणांपर्यंत पोचविण्याकरिता तुम्ही आमचे राजदूत बना, अशी विनंती उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.