Success Story: कॉलेज बाहेरील चहाचं दुकान ते कोट्यावधींची संपत्ती, अंकित राजचा प्रेरणादायी प्रवास

बिहारमधील अर्पित राज या तरुणाने कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली. पुढे शिक्षण पूर्ण करून नोकरी सोडून अर्पिंतने हा व्यवसाय मोठा केला आज तो कोट्याधीश आहे
अंकित राजचा प्रेरणादायी प्रवास
अंकित राजचा प्रेरणादायी प्रवासEsakal
Updated on

भारतामध्ये चहाप्रेमींची कमतरता नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये चहाचा बिझनेझ ट्रेंडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. भारतातील चहा शौकिनांमुळेच Tea Lovers चहाच्या बिझनेच्या जोरावर अनेकजण कोट्याधीश होत आहेत. Know Success Story of Aarpit Raj Tea Business in Bihar

अनेकांनी चांगलं शिक्षण घेऊनही किंवा चांगली नोकरी सोडून चहाचा व्यवसाय सुरू करून कोट्यावधी रुपयांची कमाई केल्याच्या वार्ता तुम्ही ऐकल्या असतील. खास करून सध्याची तरुण पिढी Young Generation या व्यवसायात उतरू पाहत आहे.

अर्थात असे फार कमीजण आहेत ज्यांनी अगदी शून्यापासून चहाच्या व्यवसायाला Business सुरुवात केली आणि त्यात मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने पुढे यश मिळवलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत.

बिहारमधील अर्पित राज या तरुणाने कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली. पुढे शिक्षण पूर्ण करून नोकरी सोडून अर्पिंतने हा व्यवसाय मोठा केला आज तो कोट्याधीश आहे.

कॉलेजमध्ये असतानाच सुचली कल्पना

२०१५ सालामध्ये अर्पित राज शिलाँगमध्ये बीबीएचं शिक्षण घेत होता. यावेळी रात्रीच्या वेळी हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची त्यांना फारशी परवानगी नसे. अनेकदा तो आपल्या मित्रांसोबत मोठ्या मुश्किलीने खाण्या-पिण्याच्या शोधात हॉस्टेल बाहेर पडायचा मात्र यावेळी सर्व हॉटेल किंवा स्टॉल बंद असंत.

मित्रांसोबत असताना एके दिवशी अर्पितच्या डोक्यात एक कल्पना आली. कॉलेजच्या बाहेरचं चहाचं दुकानं टाकलं तर छान चालेल असं त्याच्या डोक्यात आलं. त्यानंतर काही मित्रांसोबत अर्पितने कॉलेज समोरचं चहाचा स्टॉल सुरू केला. हा स्टॉल चांगला चालू लागला.

हे देखिल वाचा-

अंकित राजचा प्रेरणादायी प्रवास
Business Success Story: काच कापण्याचं काम करणाऱ्या मुलीने उभारला ४० हजार कोटींचा व्यवसाय

हॉस्टेलच्या रुममधून टिफिन सर्विस

हॉस्टेलमध्ये अनेकांची रात्रींच्या खाण्याची मोठी अडचण होतं. हे लक्षात घेऊन अर्पित आणि त्याच्या मित्रांनी हॉस्टेलच्या रुममधूनच टिफिन सर्विस सुरू केली. खास करून खाण्या-पिण्याची आवड असलेल्या खव्वय्यासाठी ही एक उत्तम सोय होती.

त्यानंतर सर्व मित्र मिळून एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. इथं त्यांनी व्यवसाय वाढवायचं ठरवलं. ऑर्डर पूर्ण करता याव्या म्हणून त्यांनी एका महिलेला कूक म्हणून ठेवलं. स्कूटीवरून हे तरूण डिलिव्हरी देऊ लागले. तेही ३० मिनिटांच्या आत.

२०१८ साली चहाचं दुकान करावं लागलं बंद

२०१८ या सालामध्ये अर्पितचं ग्रॅज्यिएशन पूर्ण झालं. मात्र याच वर्षी त्याला कॉलेज समोरील चहाचं दुकान बंद करावं लागलं. तिथल्या नियमांनुसार व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी स्थानिक लोकांना भागिदार बनवणं बंधनकारक असल्याचा दबाव आल्याने त्यांनी दुकान बंद केलं

नोकरीची सुरुवात केली मात्र...

अर्पित दिल्लीला आला आणि त्याने एक स्टार्टअपमध्ये नोकरी सुरु केली. दीड वर्ष अर्पितने नोकरी केली. मात्र कॉलेजमध्ये सुरू केलेला व्यवसाय डोक्यातून जात नव्हता. यावेळी त्याने मित्रांशी चर्चा केली. अर्पितचा एक मित्र सॉफ्टवेअर इंजिनियर तर दुसरा सीए होता.

तिन्ही मित्रांनी मिळून चहाचा बिझनेस मोठ्या पातळीवर चांगला चालू शकतो, असा विचार केला. दिल्लीतच तिनही मित्रांनी मिळून कॉलेजमधील चहाचा व्यवसाय पुन्हा सुरु केला. आता ‘चाय सेठ’ या नावाने त्यांच्या संपूर्ण देशभरामध्ये २७ शाखा आहेत. या आउटलेटमध्ये दालचिनी चहा, बटरस्कॉच चहा, काळीमिरी चहा असे एकूण २५ फ्लेव्हरचे चहा मिळतात.

अर्पित आणि त्याचे मित्र आज या व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.