यिन पुणेच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन.

यिन पुणेच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन.
Updated on

पुणे, ता ३ : यंदाच्या आषाढी सोहळ्यात भाविकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन सकाळ यिन पुणे शहर व मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्या वतीने करण्यात आलं होते. पुणे येथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या ज्या मुख्य रस्त्यावरून जातात त्या ठिकाणी हे शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिराला १०० हुन अधिक वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला.

या मध्ये वृद्ध, महिला, लहान मुले यांची संख्या अधिक होती. पंढरपूर येथे आषाढी वारी साठी निघालेल्या सर्व वारकऱ्यांना अराम पडावा या हेतूने गेले २ वर्ष हे आरोग्य शिबीर भारावले जात आहे.

या आरोग्य शिबिराला मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. सुचेता गोल्हार, सहायक प्राध्यापक डॉ. ओमकार भुजबळ, डॉ. हर्षल रसाळ मॉडर्न फिजिओथेरेपी यिन टीम सदस्य डॉ. हार्षकेश देशमाने, डॉ अमर कड, डाॅ. मानव राजपुरोहित, डाॅ. ऋतुजा हुमनाबादे डाॅ. प्रतिक्षा शिंदे, डाॅ. आकाश‌ बरागडे, डॉ. समृद्धी बोराडे, मधुमालती बैरागी, सोहम दरेकर, भाग्यश्री मुटकुळे, ऋतुजा थिगळे, मंदार सोनार आधी उपस्थित होते.

वृद्ध महिलेची फिजिओथेरपी तपासणी करताना यिन चे विद्यार्थी.
वृद्ध महिलेची फिजिओथेरपी तपासणी करताना यिन चे विद्यार्थी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.